विशाखापट्टणममध्ये वायू गळती, बालकासह आठ जणांचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- May 07, 2020
- 1029 views
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये कारखान्यातून वायू गळती झाल्याने हाहाकार उडाला आहे. आरआर वेंकटपुरम गावात असलेल्या ‘एलजी पॉलिमर्स इंडिया’ कंपनीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रासायनिक वायू गळती झाली. यामध्ये एका चिमुरड्यासह आठ जणांचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त आहे. जवळपास दोनशे नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे.
विशाखापट्टणम शहरातील आरआर वेंकटपुरम या गावात एलजी पॉलिमर कंपनीचा केमिकल गॅस प्लांट आहे. या प्लांटजवळील रहिवाश्यांनी डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सुरुवातीला केली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
दरम्यान, गॅसगळती थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. वायूचा कमाल प्रभाव सुमारे एक ते दीड किमी परिसरात होता, तर वास दोन ते अडीच किमी भागात पसरला होता. 100 ते 120 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम