उल्हासनगरात कोरोना बाधितांचा आकडा पोहचला १७ वर

उल्हासनगर  : उल्हासनगरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे . काल एक नवीन महिला रुग्णाचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णाचा आकडा आता १७ वर पोहचला आहे . तर ८७ वर्षीय महिलेचा मृत्यु कोरोना ने झाल्यावर तिच्या नातेवाईकासह एकुण ६९ लहान मुले  महिला पुरुष याना  भिवंडी बायपास येथिल टाटा क्वारंटाईन सेंटर येथे क्वारंटाईन केले होते . परंतु यातील त्या महिलेच्या मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असुन बाकी ६८ जणाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याना घरी सोडन्यात आले आहे .  

उल्हासनगर शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत . संम्राट अशोक नगर कॅंप ३ येथे राहणारी ३० वर्षीय महिला ही पोटात गोळा असल्याने ऑपरेशन करिता कल्याण येथिल मीरा  रुग्णालयात दाखल झाली होती .तेव्हा तिची  त्या रुग्णालयात कोरोना तपासणी करन्यात आली होती . दरम्यान तिचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने मीरा रुग्णालयातील डॉक्टरानी त्या महिलेला अंबुलंस करुन दिली आणि तिला प्रथम रुखमिनीबाई या रुग्णालयात पाठवले तेथुन तिला उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयात नेन्यात आले . तर तेथिल डॉक्टरानी तिचा अहवाल चेक करुन तिला उपचारा करिता कॅंप ४ येथिल कोविड १९ या रुग्णालयात पाठवन्यात आले आहे . असा त्या महिला रुग्णाचा प्रवास मीरा रुग्णालयाच्या हलगर्जी पणा मुळे झाला असुन त्या रुग्णालयावर कारवाई करन्याची मांगणी अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी रगडे यानी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कडे केली आहे . दरम्यान ८७ वर्षीय महिलेच्या मृत्यु नंतर फालवर लाईन येथिल ६९ जणाना क्वारंटाईन केले होते . तर यातील ६८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत . तेव्हा त्याना घरी सोडन्यात आले असुन फालवर लाईन येथे त्यांचे माजी महापौर मालती करोतिया . कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष राधारचन करोतिया व परिसरातील नागरिकानी टाळ्या वाजवुन त्यांचे स्वागत केले आहे .

संबंधित पोस्ट