
कोरोनाची भीती ?
- by Adarsh Maharashtra
- May 06, 2020
- 416 views
प्रत्येक देशामध्ये कोरोना व्हायरस हा प्रश्न चिन्ह बनला आहे.त्याची भीती बाळगावी का सामना करावा? हा प्रत्येक नागरिकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे.या वायरस ने गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण विश्वामध्ये भीतीचे वातावरण पसरवलेले आहे .सर्वांच्या मनामध्ये याची भीती निर्माण झालेली आहे. परंतु कोरोना वायरसच्या आगोदर भारतामध्ये प्लेग, सार्स, चिकनगुनिया,स्वाईन फ्लू अशा कित्येक रोगाने देशाला त्रासले होते. या सर्व आजारांचा सर्व जनतेने सामना केला. परंतु कोरोना वायरस मुळे संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली जगत आहे.आणि ते काही प्रमाणात खरेही आहे. म्हणतात ना कोणतेही संकट आले तर त्याचा सामना खंबीरपणे समोर जाऊन करावा, परंतु या वायरसचा सामना करण्याकरीता त्याला सामोरे न जाता ,घरात राहावे व त्याची साखळी तोडावी, असे वारंवार WHO आणी सर्व देशाचे सरकार जनतेस आवाहन करीतआहे. कोरोनाची भारतामध्ये सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक भारतीयांनी त्याचा सामना करण्याचे ठरवले. हॉस्पिटल, दुकाने , मॉल, भाजी मार्केट याठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येकाने आपली जीवनचर्या चालू ठेवण्याचे काम केलं .आपण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या रक्षणा करीता मास्क व सेनेटायझरचा उपयोग करून घरा बाहेर पडत होतो. घरा बाहेरून आल्यावर घराच्या बाहेरच हॅन्ड वॉश ने हात स्वच्छ धुऊन घरात प्रवेश करत होतो. प्रत्येकाला त्याची भीती होती. परंतु जस-जसा वेळ जात आहे, तस-तसा प्रत्येक माणूस याच्या भीतीला न घाबरता, आपलं रोजचं दिनचर्या कार्य करत आहे.आज पाहिलं तर प्रत्येक जण डिस्टन्स न ठेवता बाहेर फिरताना दिसत आहे. जॉगिंगला जाताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी फिरताना दिसत आहे. इटली, अमेरिका, यांची परिस्थिती पाहून प्रत्येक जण या रोगाला सामोरे जाण्यास घाबरत होते. परंतु आजच्या घडीला जर पाहिलं तर भारतामध्ये कोरोना व्हायरसचा आकडा पन्नास हजाराच्या आसपास पोहोचला आहे .ज्या वेळेस केवळ भारत देशामध्ये पन्नास रुग्ण होती त्यावेळेस याची प्रत्येक जण भीती बाळगत होते. परंतु आजच्या घडीला संपूर्ण भारतात कोरोनाची हजारों रूग्ण झाले तरी ही त्याचं गांभीर्य आपण समजून घ्यायला तयार नाहीत. काल एका न्युज चॅनलवर मालेगाव शहरातील सफाई कामगाराची बातमी दाखवत होते. तो सफाई कर्मचारी रोज काम करत असताना त्याला कोरोना ची बाधा झाली. या पासून त्याच्या परिवारातील पत्नी, व तीन वर्षाच्या मुलीला ही कोरोनाची लागण झाली, संपूर्ण परिवाराला कोरोना झाला.तो सफाई कर्मचारी टीव्हीवर बोलत आसताने जोरजोराने रडून आपले दुःख व्यक्त करत होता. माझ्या तीन वर्षाच्या मुलीला योग्य उपचार मिळत नाही.तिला खायला दुरून बिस्किटे दिले जातात. आम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात यावे, याची तो विनवणी करत होता. जो पर्यंत कोरोना होत नाही, तो पर्यंत त्याची तीव्रता आपल्याला समजत नाही. ज्याला झालाय त्यालाच त्याचं दुःख माहित आहे. आज जर पाहिलं गेलं तर रोज दोन ते तीन हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह झालेले आढळून येतात .जर आपल्या देशामध्ये अशाच पद्धतीने चालत राहिलं तर आपल्या देशाची इटली , अमेरिका , स्पेन, जर्मनी, चीन इत्यादी देशाहून ही भयानक परिस्थिती होऊ शकते. हे आपण विसरता कामा नये .भारत सरकारने भारताच्या आर्थिक मजबुती ला बळकटी देण्यासाठी मद्यपान दुकाने उघडण्याची परवानगी दिली .त्यांचा उद्देश हा होता की , देशाच्या तिजोरीत काही प्रमाणात कर जमा होईल .परंतु जशी ही दुकाने उघडली तर या दुकानासमोर पाचशे मीटर इतक्या दूरवर रांगाच- रांगा लागलेल्या दिसून आल्या.कुणालाही सोशल डिस्टन्स चे भान राहिले नाही. जसे वाळवंटात एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याची आवश्यकता असते , तशीच स्थिती तळीरामांची पाहायला मिळाली. दारूच्या मोहा पाई कोरोना बिमारी ला ही ते विसरून गेले. आपल्या जिवाची जीवित हानी होईल याची त्यांना थोडी ही भीती राहिली नाही. नाविलाजाने सरकारला आपला निर्णय वापस घ्यावा लागला. शासन आपल्या जीवासाठी अहोरात्र मेहनत करून आपणास या बिमारी पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे , याला आपण थोडेसे गांभीर्याने घ्यायला हवे. मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये जेव्हा पोलीस फिरतीवर आसतात , त्यावेळेस पोलिसांना पाहून काही लोक बाजूला होतात .आणी ते गेल्यावर लगेच बाहेर फिरताना दिसून येतात. आपण विसरतो की आपण पोलिसाला धोका देत नसून स्वतःला धोका देत आहोत. हे सर्व पाहता भीती नावाची गोष्टच कुठे दिसत नाही. काही लोक म्हणतात, आम्ही तरुण आहोत , आम्हाला काही होणार नाही. परंतु जर योग्य साधन सामग्री, दवाखान्यामध्ये मुबलक प्रमाणात औषधी व डॉक्टर नसतील तर यापासून ठीक होणे जरा कठीणच जाईल . वेळेत आपण याला नीट समजून नाही घेतले तर आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. याचे भान आपण ठेवायला हवे. कोरोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर सर्वांनी मिळून भीती न बाळगता घरातच राहुन कोरोनाच्या साखळीला तोडावे लागेल. व आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवे- "आपण बाहेर तर कोरोना घरात, आपण घरात तर कोरोना बाहेर."
राधा कांबळे
संशोधक विद्यार्थी मुंबई
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम