पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा स्वतःची सुटकेस भरतेय:-प्रियांका गांधी
- by Adarsh Maharashtra
- May 06, 2020
- 666 views
नवी दिल्ली, : मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर ६ मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची एमआरपी जशीच्या तशीच राहील. कोरोनाच्या महारोगराईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडील काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी किमतीत सातत्यानं घसरण सुरूच ठेवली होती. ही वाढ पूर्णपणे अतिरिक्त अबकारी शुल्काच्या स्वरुपात असल्याने त्याचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त होईल, असे तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या निर्णयावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष केलं आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत ल़ॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर पुढे काय असा थेट प्रश्न उपस्थित केला. १७ मे या दिवशी लॉकडाऊनचा तिसरा टप्पाही पूर्ण होत आहे. त्यानंतर सरकारची काय रणनिती आहे, अशी विचारणा त्यांनी केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम