मध्यवर्ती पोलिस ठाणे विरुध्द मध्यवर्ती रुग्णालय यांच्यात मारहाणीवरुन रंगला वाद .

ल्हासनगर  : उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयाच्याच जागेत असलेल्या  मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक खातिब याने  रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक सतिश वाघ याना केलेल्या  मारहाणीचा वाद चांगलाच रंगला आहे . तर पोलिस अधिकारी हे वाघ यांच्यावर दबाव आणुन तक्रार मागे घेन्यास सांगत असल्याचा आरोप वाघ यानी केला आहे. तर सकाळी रुग्णालयाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यानी रस्त्यावर येवुन पोलिसांच्या विरुध्द आंदोलन केले आहे . तर त्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मांगणी केली आहे . 


उल्हासनगर मध्ये असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयाच्याच जागेत मध्यवर्ती पोलिस ठाणे आहे . दररोज पोलिसांची या रुग्णालयात ये जा असते . दरम्यान पर राज्यातील मजुराना वैद्यकिय प्रमाणपत्र देण्या करिता मोठी गर्दी झाली होती . त्या गर्दीला आवरन्या करिता पोलिस बंदोबस्त ठेवन्यात आला होता . तर त्या प्रमाणपत्रावर कोविड तपासणी केली असल्याचा नवीन रबरी शिक्का बनवायला टाकला होता . तर तो शिक्का घेण्या करिता रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक सतिश वाघ हे गेले होते .दरम्यान ते शिक्का घेऊन परत रुग्णालयाच्या आवारात आले असता दुचाकी पार्क करण्यावरुन खातिब व वाघ यांच्यात वाद झाला . तेव्हा खातिब यांनी वाघ यांना अर्वाच्च भाषेत शिव्या देत कॉलर पकडुन खाली पाडले व बेदम मारहाण केल्याचा आरोप वाघ यानी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात केला आहे . तर खातिब यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्यात याव मागणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस,वाॅर्ड बॉय,आया,सफाई कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी यानी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले . सतिश वाघ हे रुग्णालयात उपचारा करिता दाखल असताना पोलिस ठाण्यातील एक ही कर्मचारी त्यांचा जबाब घेण्या करिता आला नसल्याचा ही आरोप वाघ यांनी केला आहे . तर वाघ यांच्यावर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी दबाव आणुन तक्रार मागे घेण्यास सांगत असल्याचे ही वाघ यानी सांगितले आहे . दरम्यान वाघ याना मारहाण झालीच नसुन हा प्रकार गैरसमजुतीतुन झाल्याचे पोलिस सांगत आहेत .

संबंधित पोस्ट