सिंगापूरमध्ये 4800 भारतीयांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली :-सिंगापूरमध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेल्या 4800 भारतीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरफ यांनी दिली.

जावेद अशरफ म्हणाले, सिंगापूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 18 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4800 भारतीय आहेत. बधितांमध्ये वसतिगृहात राहणाऱ्यांची संख्या 90 टक्के आहे. त्यामुळे वसतिगृहातील गर्दी कमी करण्यासाठी अनेक कारखान्यांचे रूपांतर वसतिगृहात करण्यात आले असून, वैद्यकीय चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

 सिंगापूरमध्ये आतापर्यंत 18 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 1457 जण या आजारातून बरे झाले आहेत. तर 18 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अजूनही 17 हजार 703 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 22 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट