मराठा सेक्शनमधील रुग्णामुळे चार जणांना कोरोनाची बाधा .उल्हासनगर रुग्ण संख्या १४

उल्हासनगर :  उल्हासनगरममध्ये  राहणाऱ्या आणि धारावीच्या मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या ४० वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. या तरुणाच्या कुटुंबासह एका सहवासीत व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगर शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १४ झाला आहे.  

उल्हासनगर कॅम्प ४ मधील मराठा सेक्सन विभागात राहणारी ४० वर्षीय व्यक्ती ही  धारावी परिसरातील मेडिकलच्या  दुकानात कामाला आहे. या  व्यक्तीची कोरोना चाचणी शुक्रवारी सकाळी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून रुग्णाचे  कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या सात कुटुंबांची रवानगी टेऊराम आश्रमात करण्यात आली होती. त्यापैकी रुग्णाचे आई वडिल आणि कुटुंबातील एक सदस्य तसेच या  रुग्णाच्या वडिलांच्या  घरी येऊन मसाज करणाऱ्या तरुणाची कोरोना चाचणी सोमवारी सकाळी पॉझिटीव्ह आली आहे. 

उल्हासनगर कॅंप ४ येथिल   संभाजी चौकातील कुटुंबानंतर संक्रमणाचे हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.यामुळे उल्हासनगरातील  कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा १४ झाला आहे. त्यापैकी दोन बरे झाले असून ११ जणांवर उपचार सुरु आहे. तर ८७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

संबंधित पोस्ट