मध्यवर्ती रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षकाला सहाय्यक पोलिस निरीक्षकाची जबर मारहाण .
- by Rameshwar Gawai
- May 04, 2020
- 1173 views
उल्हासनगर : लॉकडाऊन मुळे परराज्यात जाणाऱ्या मजुराना वैद्यकिय प्रमाणपत्र देन्याचे काम सुरु असताना त्या प्रमाणपत्रा करिता लागणारा नवीन शिक्का बनवुन परत रुग्णालय परिसरात येवुन आपली मोटार सायकल पार्किंग करत असताना रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक सतिश वाघ याना सहाय्यक पोलिस निरीक्षक खातिब यांनी जबर मारहाण केली असुन वाघ यांचे डोके फुटले आहे तर मुक्का मार सुध्दा जबर लागल्याने त्याना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे तर मारहाणी मुळे रुग्णालयातील डॉक्टर . नर्सेस ,वार्डबॉय,आया ,सफाई कर्मचारी हे काम बंद करन्याच्या पवित्र्यात आहेत.तर त्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी या कर्मचाऱ्यानी केली आहे .
उल्हासनगरात राहणारे परराज्यातील मजुर याना गांवी जान्या करिता वैद्यकिय प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने या मजुरानी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . तेव्हा मध्यवर्ती रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . तर त्या वैद्यकिय प्रमाणपत्रा करिता नवीन शिक्का बनवण्यासाठी करिता रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक सतिश वाघ हे गेले होते दरम्यान ते नवीन शिक्का घेऊन रुग्णालय परिसरात आले व आपली मोटार सायकल पार्किंग करत असताना त्याना मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खातिब यानी हटकुन गाडी बाहेर लावा असे सांगितले . तर मी याच रुग्णालयातील अधिकारी असल्याचे सांगुन त्याना ओळख पत्र दाखवले . परंतु खातिब यानी काही एक न मला मारहाण करण्यास सुरवात केली असल्याचा आरोप सतिस वाघ यानी केला आहे. तर त्यांचे डोके फुटले असुन जबर मार लागल्याने उपचारा करिता वाघ याना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे . दरम्यान वाघ याना झालेल्या मारहाण प्रकरणी रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी काम बंद करण्याच्या तयारीत आहेत . तर त्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्याची मागणी केली आहे .
दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे याना या मारहाणी बाबत विचारणा केली असता ते म्हणाले की त्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणुन आम्ही पोलिस उपायुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मध्यवर्ती पोलिस ठाणे याना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम