मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने ४ मे पासून उघडणार नाहीत;
राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
- by Adarsh Maharashtra
- May 03, 2020
- 1438 views
मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यातच राज्यातील लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. मुंबई ,पुणे, पिंपरी,चिंचवड , मालेगाव या परिसरात कोरोनाचे अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने या सर्व शहराचे रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव परिसरातील कार्यालये दारुचे दुकाने आणि ४ मे पासून उघडता येणार नाहीत, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे.तसेच या चारही शहरातील सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील झोन्सची यादी जाहीर झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये, १६ ऑरेंज तर ६ ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव मध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे या चारही शहरांचा समावेश रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या तत्वानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरु करता येणार आहेत. तसेच दारुचे दुकाने आणि इतर दुकानेही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम