
उल्हासनगरात सापडला कोरोनाग्रस्त रुग्ण. महापालिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ
- by Rameshwar Gawai
- Apr 27, 2020
- 1012 views
उल्हासनगर : काही दिवसां पुर्वी उल्हासनगर कँ.५ परीसरात कोरोनाग्रस्त(पाँझिटिव्ह) रुग्ण) सापडला होता.त्याला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असतांना,आज कँ. - ४ परीसरात पुन्हा एक नविन कोरोनाग्रस्त(पाँझिटिव्ह) रुग्ण मिळून आला.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.त्यास अधिक उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले असून परीवाराला क्वाँरंटाईन करण्यात आलं आहे.शहरात कोरोना बाधित रुग्णांन मध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे.
उल्हासनगर शहरात कोरोना व्हायरस या महामारी आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.परिणामी दाटीवाटीचं शहर असूनही काल पर्यंत हे शहर कोरोना संसर्गा पासून सुरक्षित होते. मात्र या शहरात वास्तव्यास असणारे पंरतु मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी करोनाग्रस्त रुग्ण म्हणून आढळून येत आहेत. काही दिवसां पुर्वी कँम्प -५ परीसरात एक करोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता.पालिका प्रशासनानं सदरचा परीसर सील केला होता.रुग्णाला उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले होते.तसेच त्याच्या कुटुबियांना क्वाँरंटाईन करण्यात आले होते.त्याचे कुटुंब आणि संपर्कातील अन्य जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल कँम्प -४ मधिल संभाजी चौक परीसरातील जिजामाता काँल नी ये थे एक जण कोरोनाग्रस्त(पाँझिटिव्ह) असल्याचा आढळून आला. सदरची वव्यक्ती ही मुबंई पोलिस दलात कार्यरत आहे.त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथिल दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.तर परीवाराला क्वाँरंटाईन करण्यात आलं आहे.सदरचा परीसर सील करण्यात आला आहे कोरोना पाँझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ३ झाली आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या चिंतेत वढ झाली आहे.यापुढेही संख्या वाढू नये म्हणून प्रशासना कडून कडक खबरदारीचे उपाय योजण्यात येणार असल्याचं प्रशासना कडून सांगण्यात आलं आहे.
तिन दिवस भाजी,फळं, तत्स्म सेवा बंद
शहरात वाढणारे कोरोनाग्रस्त रुग्ण ही चिंतेची बाब आहे.भाजी आणि फळ विक्रेते नियमांच पालन करत नसल्याचं दिसून येत आहे.त्यांच्यामुळे शहरातील परस्थिती बिघडू नये म्हणून २८/०४२०२० ते ३०/०४/२०२० रात्री १२ वा.पर्यंत भाजी व फळ विक्री बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.किराणा दुकान,दुध,व मेडिकल नियोजित वेळेत सुरुच राहातील.तसेच नाका बंदी आणि सीमा बंदी अधिक कडक करण्यात येणार असल्याचं संकेतही त्यांनी दिले आहेत.येणारा काळ कठीण आहे.नागरीकांनी घरातच बसावे.सीमा उल्लंघन करु नये, कुणाला पाव्हणा म्हणून बोलवू नये.अशी विनंती देखिल केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम