लाॅकडाऊन मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीसाला अपघात .

उल्हासनगर :उल्हासनगर लगत कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ पोलीस चौकीचे समोर लावण्यात आलेल्या नाकाबंदी वर 

तपासणी करीत असलेल्या महिला पोलीसाला स्काँँर्पिओ गाडीने जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.   गाडीचालकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे , कोव्हीड  -१९  संसर्ग पसरविणे या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,  ठाणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस शिपाई प्रिती  जाधव या कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या म्हारळ बीट पोलीस चौकी वर  कार्यरत होत्या. लाॅकडाऊन, संचारबंदी दरम्यान त्या येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करित होत्या.  इतक्या त, उल्हासनगर शहाड च्या पुढे  धोबीघाट येथे  बिर्लागेट कडून म्हारळ च्या दिशेने स्कार्पिओ नं एमएच ०५ ,बीबी  १११ ही गाडी भरधाव वेगाने आली. 

महिला पोलीस प्रिती जाधव यांनी ती गाडी तपासणी करीता अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, निशांत देशमुख या वाहकाचे गाडीवर नियंत्रण न मिळवता आल्याने त्याने जाधव यांना धडक दिली.  त्यांच्या हाताला जबर धक्का लागला. त्याना उपचारासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय  येथे नेण्यात आले. या बेदरकार वाहकाच्या विरोधात  टिटवाळा पोलीस ठाण्यात मध्य रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, संचार बंदीचे उल्लंघन,  कोव्हीड १९ साथीच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास म्हारळ  पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग  रजपूत हे करित आहे..

संबंधित पोस्ट