दाने दाने पे.लिखा है ,खाने वालेका नाम ...

उल्हासनगरात टाकाऊ प्लास्टिक पासुन बर्ड फिडिंग व्यवस्था .

उल्हासनगर : या लाँकडाऊनच्या काळात माणसांप्रमाणे पशु पक्षांची ही उपासमार मोठ्या प्रमाणात होतेय. काही दिवसांपूर्वी सी एच एम महाविद्यालयात उपासमारीने ३० कावळ्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला होता. हे  वृत्त माध्यमांमधून प्रकाशित झाले होते . यामुळे अनेक प्राणीमित्र या पशुपक्षांच्या मदतीसाठी पुढे धावुन आले.  यापैकीच टाकाऊ प्लास्टिक प्लेट्स आणि पाण्याच्या बाटल्यांं पासून या पक्षांच्या दाण्या पाण्याची सोय करणारे बर्ड फील्डिंग लेट्स तयार 

करण्याची किमया काही सामाजिक कार्यकर्त्यानी साधली आहे . 

शहरातील प्रदूषण आणि प्लास्टिकमुक्ती वर काम करणाऱ्या हिराली फाउंडेशन या सामाजिक संस्थेने हा पुढाकार घेतलाय.  संस्थेच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी  यांच्या संकल्पनेतून आपल्या सहकाऱ्यांसोबत  प्लास्टिकच्या टाकाऊ प्लेट्स आणि बिसलरी, सोडा, थंडपेयाच्या बाटल्या एकत्र करून  २०० पेक्षा अधिक बर्ड फील्डिंग प्लेट्स बनवल्या गेल्या आहेत.  आणि त्या शहरात ज्या त्या ठिकाणी पक्षी विसाव्याला येतात . अशा झाडांच्या फांद्यांवर प्लेट्स लटकविण्यात आल्या आहेत.  या प्लेटसमध्ये वारंवार धान्याची रसद पोहोचवली जाणार असल्याचेही खानचंदानी यांनी सांगितले . 

टाकाऊ प्लास्टिकचा योग्य वापर आणि पक्षांच्या जेवणाची उत्तम सोय हे दोन्हीही कार्य साधण्यात ही संस्था यशस्वी ठरलीय.  यामुळे आता  ' '  दाने दाने पे लिखा है , खानेवाले का नाम ' ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. या उपक्रमा करीता  मनपा प्रशासन व नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे

संबंधित पोस्ट