
शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचा , हालगर्जीपणा चव्हाट्यावर.
गर्भवती महिलेला दोनदा हाकलले... घरीच झाली प्रसुत
- by Rameshwar Gawai
- Apr 26, 2020
- 1063 views
मध्यवर्ती रग्णालयाच्या निष्काळजीपणाला कधी बसणार लगाम .
उल्हासनगर / प्रतिनिधी: एक गर्भवती महिला तिचे प्रसुतिचे दिवस भरल्यानं ती उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात प्रसुती साठी गेली.मात्र येथिल डाँक्टरांनी तिला दाखल करुन घेण्याऐवजी घरी पाठवले.एकदा नाही,दोनदा.येण्या-जाण्याच्या त्रासात ती गरीब माऊली घरीच बाळंत झाली.हि बाब जेव्हा समाज सेवक शिवाजी रगडे यांना कळाली. तेव्हां ते स्वतः सदर महिलेला त्याच दवाखान्यात घेऊन गेले.आता तिला अँडमिट करण्यात आलं असून माता व तिची नवजात शिशु सुखरुप आहे.शासकीय रुग्णालयातील अंग झटकू निष्काळजीपणाला आळा कधी बसणार? अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
याबाबत सविस्तर माहीती असी की उल्हासनगर कँ. -३ सम्राट अशोकनगर परीसरात बबलु शेख हे आपल्या परीवारासह राहातात.ते मोलमजूरी करून कुटुंब चालवतात. त्याची पत्नी रोशनी बबलु शेख (२६) ह्या गरोदर होत्या.गरोदरपणातील सर्व चाचण्या ह्या शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पार पडल्या आहेत.
काल सकाळी ६:००वा रोशनी यांच्या पोटात दुखु लागल्यानं, तिच्या पतीने संचारबंदी असतांना ही मध्यवर्ती रुग्णालयात तपासणी साठी नेले. तेव्हा तेथिल डाँक्टरांनी हिची वेळ भरली नाही. म्हणून परत पाठवले.पुन्हा दुपारी २:००वा . सुमारास दवाखान्यात आणले.पुन्हा डाँक्टरांच तेच उत्तर.पुन्हा तिला अडमिट करण्या ऐवजी पिटाळून लावले.अखेर सांयकाळी ७:००वा. सुमारास तिची घरीच डिलीवरी झाली.आसपास कुणीच नाही.घाब-या हातानं तिच्या पतीनं बाळाची नाळ कापली.मात्र त्यामधून रक्त वाहू लागल्यानं शेख घाबरला,त्यानं समाजसेवक शिवाजी रगडे यांना आपली हकीगत सांगितली.रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयचे निवासी डाँक्टर तडवी यांच्याशी संपर्क साधून मातेला व तिच्या नवजात शिशुला अँडमिट करुन घेतलं आहे. जर प्रसुती दरम्यान त्या महिलेला आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर त्याची जबाबदारी डाँक्टरांनी घेतली असती का? असा सवाल शिवाजी रगडे यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसां पुर्विच एक तरुण अभियंती कु. प्रणाली रामेश्वर गवई या तरुणीला डाँक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे जिव गमवावा लागला.प्रणाली हि पत्रकार गवई यांची मुलगी.याच रुग्णालयानं त्यांना रुग्ण मित्र पुरस्कार दिला आहे.याघटनेमुळे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय प्रशासना बाबत पत्रकार आणि समाजात तिव्र असंतोष पसरला आहे.तरीही येथिल प्रशासनास वैषम्य वाटू नये.हे अधिक निंदनिय असून येथिल डाँक्टरांना नेमकं झालय काय? याचा शोध घेण गरजेचं असल्याचं मत उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र धांडे यांनी व्यक्त केलं आहे.
या प्रकरणास जबाबदार असणाऱ्या डाँक्टरांची तक्रार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्रीतसेच आरोग्य विभागाला करणार असून त्याच्यावर कारवाईची मागणी करणार असे शिवाजी रगडे यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम