विमानसेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही - केंद्र सरकार
- by Adarsh Maharashtra
- Apr 19, 2020
- 475 views
नवी दिल्ली:-सरकारी विमान सेवा कंपनी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारकडून विमान सेवा सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीत एअर इंडियाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या देशव्यापी संकटाचा विचार करून आम्ही देशांतर्गत विमान उड्डाणे ३ मे पर्यंत स्थगित केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठीचे तिकीट बुकिंग ३१ मेपर्यंत स्थगित केले आहे. मात्र ४ मेपासून काही ठराविक मार्गांवर आणि १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीचे तिकीट बुकिंग सुरू केले आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत ट्विट केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरु करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम