पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव

■ डहाणू तालुक्यातील 3 वर्षीय मुलीला कोरोनाचा संसर्ग

■ जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 53 वर


पालघर (प्रतिनिधी):पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका गाव पाड्यातील 3 वर्षीय मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर मुलगी वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती असून आठवड्यापूर्वी या मुलीला लक्षणे आढळल्याने तिचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबातील इतरांचे अलगीकरण करण्यात आले असून सदर कुटुंबाच्या गाव-पाड्याचा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.

         दरम्यान जिल्ह्यातील विशेषतः वसई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ती 47 वर पोहोचली आहे तर पालघर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 53 वर पोहोचली आहे. 

       जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाहनबंदी करण्यात आली असून मास्क लावणे बंधनकारक आहे तर किराणा व भाजी बाजारही एक दिवस आड जाऊन सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

         जिल्हा प्रशासनाकडून मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील रुग्ण संख्या :

वसई-विरार महानगरपालिका - 47 (4 मृत्यू)

वसई ग्रामीण - 3

पालघर तालुका - 2 (1 मृत्यू)

डहाणू तालुका - 1

संबंधित पोस्ट