वाधवान आघाडी सरकारचा जावई आहे का ?
- by Adarsh Maharashtra
- Apr 10, 2020
- 865 views
जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना अनेकांना महाबळेश्वरच्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन गारगार हवा खाण्याचे वेड लागले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा बाराशे वर पोहोचला असुन यामुळे महाराष्ट्राचे बारा वाजायला लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्स, पोलीस जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहे. आणि उद्योगपतींना महाबळेश्वर ची हवा खायची आहे.
इकडे जीवावर उदार होऊन लोक जीवन कंठत आहेत. घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.बाहेर पडले तर पोलिसांचा मार ठरलेला.शिवाय कोरोना हा पाठी पडलेला. कोरोनाला घाबरून लोक घरात राहणेच पसंत करीत आहेत. पण डी. एच. एफ. एल कंपनीचे उदयोगपती आपल्या कुटुंबासोबत खंडाळ्या हुन आपल्या सोबतीला तेवीस लोकांना घेऊन महाबळेश्वरला चालले होते.इकडे चार लोक एकत्र येऊन बोलू शकत नाही हे वाधवान महाशय तेवीस लोकांना सोबतीला घेऊन महाबळेश्वरला जाण्यास निघाले.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या असताना या उद्योगपती महाशय यांना गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी व्ही. आय. पी. ट्रेंटमेन्ट देऊन खंडाळ्याहुन महाबळेश्वर ला जाण्यासाठी परवानगी दिलीच कशी.इकडे जनता लॉक डाऊन मध्ये कोरोनाशी मुकाबला करीत आहेत आणि प्रधान सचिव वाधवानला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देतात कसे. केवळ यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता कायम स्वरूपी घरी बसवने योग्य ठरेलं.
गरीब जनतेला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय होत असेल तर जनता लॉक डाऊन तोडण्यास मागे पुढे पाहणार नाही.कोरोना गरीब आणि श्रीमंत पाहून होत नाही याचे भान असायला हवे. नियम मोडून या उद्योगपतीला खंडाळाहुन महाबळेश्वरला जाण्यास परवानगी देणाऱ्या अधीकाऱ्याना कडक शासन होणे गरजेचे आहे. वाधवान हे काय सरकारचे जावई नाहीत.
दत्ता श्रावण खंदारे
धारावी
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम