पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन

पुणे, : पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

शनिवारी रिक्षाचालकाचा कोरोना तपासणी अहवाल आला. या अहवालामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रिक्षाचालकाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या खासगी रुग्णालयात या रिक्षाचालकावर उपचार झाले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसंच, रिक्षाचालकाच्या १० नातेवाईकांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून आत्तापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी १२ जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. अशातच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे ९३ डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट