
गुन्हेगाराला क्षमा नकोच
- by Adarsh Maharashtra
- Apr 05, 2020
- 807 views
साऱ्या जगात आज कोरोना व्हायरसने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. हजारोंच्या संख्येत लोकांचा जीव घेऊन तो सुसाट पुढे सरकतो आहे. अजून किती जीव घेईल त्याचा अंदाजही बांधणे कठीण होऊन बसले आहे. लाखोंच्या संख्येत लोक रुग्णाललयांत जीवन मृत्यूच्या दारात उभे आहेत. सकाळी जिवंत असलेला माणूस सायंकाळपर्यंत जीवंत राहील न राहील याची खात्री देता येत नाहीय. रात्रीस सामान्य वाटणारा माणूस सूर्योदयाआधीच कोरोनाग्रस्त असल्याचे आढळत आहे.
साधारण डिसेंबरच्या सुमारास चिनमधील वुहान प्रांतात ह्याची पहिल्यांदा सुरुवात झाली. त्याची लागण, त्याची उत्पत्ती प्रथम कशामूळे झाली हे सांगणे कठीण असले तरी सध्य परिस्थितीत संशयाची सुई चिन सरकारकडे वळते आहे. आपल्याच देशातील गोरगरीब लोकसंख्या कमी करणे आणि आणि शत्रू राष्ट्रांना नामोहरम करणे, केवळ ह्याच उद्देशाने चिन सरकारने त्यांच्या प्रयोगशाळेत हा विषाणू बनवला असल्याचे कानावर येत आहे. आजघडीला चिन सरकारचा हा हेतू साध्यही होताना दिसतो आहे. अमेरिका, इटली, फ्रांस आदी अति प्रगत देशांत तर तेथील सरकारे हतबल झालेली पहायला मिळत आहेत. उल्लेखित प्रत्येक देशात दरदिवशी किमान ५००/६०० माणसांना नाहकच आपले प्राण गमवावे लागत आहेत. आजच्या ह्या प्रगत जगात अशी वेळ बहुदा पहिल्यांदाच आली आहे असे अनेकांकडून बोलले जात आहे. चिनमध्ये मात्र ह्या विषाणूचे थैमान अगदीच नगण्य झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. तेथील व्यापार/उदीम पुन्हा पूर्वपदावर आल्याचे सांगितले जात आहे.
आपल्या देशाचा विचार करता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपले केंद्रीय सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. प्रत्येक राज्य सरकार जीवाचे रान करत आहेत. भारतात असो वा अन्य जगतात, एवढ्या मोठ्या कालावधीसाठी सारे व्यवहार बंद ठेवावे लागणे हे अतिशय क्लेशदायक आहे. संपूर्ण जग एका अनामिक भीतीने जागच्या जागी थांबले आहे, स्तब्ध झाले आहे. गुण्यागोविंदाने नांदणारे हे जग, कुणाची तरी दृष्ट लागावी अशा प्रकारे चिडीचूप झालेले बघायला मिळत आहे.
सुरुवातीला जेव्हा ह्या विषाणूची लागण होऊन चिनमध्ये लोक मृत्यू पावत होते तेव्हा ह्या भयंकर आजाराची माहिती चिन सरकारने साऱ्या जगापासून लपवून ठेवली, कुठेही ह्याची वाच्यता देखील होऊ दिली नाही. खरेतर तेव्हाच चिन सरकारने संबंध जगाला सावध करणे आवश्यक होते. असे झाले असते तर आज ही परिस्थिती ओढवली नसती.
डॉ. लि. वेनलियांग ह्या ३४ वर्षीय चिनी डॉक्टरने चिन सरकार, सहकारी डॉक्टर्स, स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, आदींना ह्या महाभयंकर, जीवघेण्या आजाराची वेळीच कल्पना दिली होती. परंतु बुद्धी भ्रष्ट झालेल्या आणि अति महत्वाकांक्षी असलेल्या चिन सरकारने त्यांना तिथेच गप्प राहण्यासाठी मजबूर केले, त्यांना जागीच गप्प केले. पुढे काही दिवसांतच ह्याच विषाणूची लागण होऊन त्यात डॉ. लि. वेनलियांग ह्यांचा दुर्दैवी अंत झाला. ह्यावरून चिन सरकारचा ह्यामागील कुटील डाव लक्षात येतो, ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्टपणे अधोरेखित होतो. हे खरे असल्यास चिनी सरकार आणि चिनी अध्यक्ष अखंड मानव जातीचे गुन्हेगार ठरतात. सारे काही सुरळीत झाल्यावर संपूर्ण जगाने चिनविरोधात उघड मोहीम राबवून जगाच्या पाठीवर चिनला वेगळे पाडायला हवे.
मग तो व्यक्ती असो वा देश, गुन्हेगाराला माफी नकोच.
संतोष गावडे
(मरोळ-अंधेरी पूर्व)
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम