डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा १९ वर
- by Adarsh Maharashtra
- Apr 02, 2020
- 787 views
डोंबिवली, :-मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज आणखी ५ नवे रुग्ण आढळून आले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी ४ रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ०३ रुग्ण हे लग्न सोहळयाशी संबंधीत असून ०१ रूग्ण कोरोनाबाधित रूग्णाचा सहवासित आहे. नवीन रूग्णांपैकी कल्याण पुर्व येथील रूग्ण हा एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्ण कस्तुरबा रूग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.
तत्पूर्वी, डोंबिवलीत पार पडलेल्या शाही लग्नसोहळ्याला आणि हळदी समारंभाला उपस्थित राहिलेल्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेकडीतील एका तरुणाला आणि डोंबिवली रिजन्सीमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम