कोरोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी रुग्णाने घेतली १०० जणांची भेट, २३ जणांना लागण

पंजाब ; पंजाबमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमुळे राज्यातील २३ जणांना लागण झाली आहे. १८ मार्च रोजी या व्यक्तीचं निधन झालं. पंजाबमध्ये एकूण ३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी २३ जण हे त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आले होते अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. गुरुद्वारात धर्मगरु असणाऱी संबंधित ७० वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांसाठी परदेशात वास्तव्यास होती. जर्मनी आणि इटली येथे आपल्या शेजारच्या गावातील दोन मित्रांसोबत ते गेले होते. मात्र परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं नव्हतं. अनेकांची ते भेट घेत होते. ६ मार्च रोजी ते दिल्लीत पोहोचले आणि तेथून पंजाबला वाहनाने प्रवास केला.

अधिकारी सध्या त्यांनी कुठे प्रवास केला होता याची माहिती घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ८ ते १० मार्च दरम्यान आनंदपूर साहिब येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परतले होते.

धक्कादायक म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी १०० जणांची भेट घेतली होती. त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मित्रांनी राज्यातील १५ गावांचा दौरा केला होता. ही सर्व गावे सील करण्यात आली आहे. त्यांच्या कुंटुंबातील १४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांचा नातू आणि नातीने तर हजारो जणांची भेट घेतली आहे.

तिघांच्या बेजबाबदार वागण्यामुळे अधिकारी प्रत्येक गावाला भेट देत असून त्यांनी भेट घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहेत. या तिघामुळे मोहाली, अमृतसर, होशियारपूर, जलंधर या गावातील काही लोकांना करोनाची लागण झाली आहे. सध्या देशभरात कोरोनाचे एकूण ७०० रुगण असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट