ग्रामस्थांनी केलेली गावबंदी बेकायदेशीर
प्रशासनाचा करवाईचा इशारा
- by Adarsh Maharashtra
- Mar 25, 2020
- 653 views
पालघर (जयेश शेलार) कोरोनाच्यावाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गावा-गावात आता मुख्य रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्यांस गावबंदी करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण ही गावबंदी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मात्र ही गावबंदी बेकायदेशीर असून अशी गावबंदी करणारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.बाहेरील व्यक्ती गावात येऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी अनेक गावातील ग्रामस्थांनी गावात येणारे रस्ते बंद करताना रस्त्यात सिमेंट पाईप, मोठं-मोठी लाकडे तसेच काहींनी रस्त्यावर काट्यांची झाडे आणून टाकली आहेत.
मात्र या गावबंदीमुळे गावात रात्री-बेरात्री येणारे पेशंट, डॉक्टर्स, नर्स, पोलीस व अत्यावश्यक सेवा देणारे अन्य व्यक्ती यांना अडचण होऊ शकते तर काही गावामध्ये 2-4 गावांचे मिळून रेशनिंग दुकान, बँका, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस एकत्र आहे, त्यामुळे गावातील ग्रामस्थांनाही गाव बंदी केल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते.
तसेच गावात जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे किराणा दुकानदार, भाजीपाला, पिण्याचे शुद्ध पाणी आदी वस्तू पुरविणारे व ट्रॅक्टर-शेती अवजारे वाहतूक करणारी वाहने यांना अटकाव होऊ शकतो. त्यामुळे कोणीही गावांना जोडणारे रस्ते बंद करू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात होत असलेली जागृती कौतुकास्पद असली तर रस्ते बंद करून केली जाणारी गावबंदी बेकायदेशीर असून असे कृत्य करणारांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे...
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम