पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 28 दुकानदारांवर गुन्हे दाखल
- by Adarsh Maharashtra
- Mar 20, 2020
- 942 views
पालघर : कोरोना प्रभाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 28 दुकानांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेतकोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून अत्यावश्यक औषधालये, किराणा सामान, दूध, फळे व भाजीपाला वगळून इतर सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकाने, बियर, वाईन शॉप, सर्व देशी दारू दुकाने, हॉटेल, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १२ हॉटेल, ३ डॉक्टर, ६ दारु दुकान, १ चिकन सेंटर, १ कापड दुकान, १ खेळणे दुकान, १ कोरोना शिबिर, १ मोबाईल शॉप व 2 इलेक्ट्रॉनिक शॉप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस मुख्यालयातून दिलेल्या माहिती पत्रकात देण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी तसेच सर्व व्यापारी-उद्योजक व नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरवसिंह यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम