रेशनिंगवर मास्क-सॅनिटायझर उपलब्ध करावे व मजुरांना आर्थिक मदत देण्याची भाजप जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांची मागणी

पालघर(प्रतिनिधी): सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रसार थांबावा, यासाठी मास्क व सॅनिटायझर यांचे रेशनिंग दुकानात उपलब्ध करून द्यावेत तसेच काम-धंदे व व्यवसाय बंद असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केली आहे.

       या मागण्यांचे निवेदन वाडा तहसीलदारांमार्फत  पालघर जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले असून यावेळी भाजपचे पदाधिकारी राजेंद्र पाटील, मंगेश पाटील, मनीष देहरकर, उल्हास सोगले आदी उपस्थित होते. 

            ग्रामीण भागातील जनतेला मास्क व सॅनिटायझर उपलब्ध होत नसल्याने व परवडत नसल्याने रेशनिंग दुकानावर उपलब्ध करणे गरजेचे असून कामधंदे व रोजगार उपलब्ध नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे नंदकुमार पाटील यांनी केली आहे 22 मार्चच्या कर्फ्युमुळे उत्तरकार्य एक  दिवस अगोदर
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला ग्रामीण जनतेचा प्रतिसाद

जगभरात फैलाव झालेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी (दि. 22 मार्च) देशात जनता कर्फ्यु राखण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेचाही प्रतिसाद लाभत असून उत्तरकार्यासारखे विधीमध्येसुद्धा आता फेरबदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

            वाड्यातील गांधरे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे निवृत्त सचिव असणारे भगवान नामदेव ठाकरे यांचे 10 मार्चला निधन झाले असून प्रथेप्रमाणे त्यांचा उत्तरकार्य विधी तेराव्या दिवशी म्हणजे रविवारी (22 मार्च) आयोजित केला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  ठाकरे कुटूंबियांनी तेराव्याचा उत्तरकार्य विधी आदल्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी शनिवारी (21 मार्चला) करण्याचे ठरविले आहे.
     
         कोरोनाचा वाढलेल्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (22 मार्च) जनता कर्फ्यु जाहीर केला असून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे जनतेला आवाहन केले आहे. या आवाहनाला आता ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट