देश संकटात असताना जबाबदारी पासून पळ काढू नका- नरेंद्र मोदी

कोरोनमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्यास पंतप्रधानांचा नकार

दिल्ली (प्रतिनिधी):  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी करणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदी यांनी कडक शब्दात हजेरी घेत देश संकटात असताना जबाबदारी पासून पळ काढू नका असे सुनावले आणि अधिवेशन स्थगित करण्याची मागणी धुडकावून लावली. सध्या दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र या अधिवेशनावर सुद्धा कोरोनाच्या भीतीचे सावट आहे त्यामुळे काही खासदार घाबरलेले आहेत आणि याच घाबरलेल्या खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली होती मात्र खासदारांच्या या मागणीवर पंतप्रधान मोदी चांगलेच संतापले आहेत. काल भाजपा खासदारांच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की देशावर कोरोनाचे संकट आहे आणि देशातील जनता या संकटाचा मुकाबला करीत आहे . वेगवेगळ्या रुग्णालयातील डॉकटर नर्सेस रात्रीचा दिवस करून कोरोना बाधित पेशंटना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांनी या सर्वांच्या पाठीशी उभे राहायला हवे पण काही लोक तसे न करता संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी करून जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र हे चुकीचे आहे म्हणूनच त्यांची अधिवेशन स्थगित करण्याची मागणी मान्य केली जाणार नाही अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरल्या वेळेपर्यंत म्हणजेच ३ एप्रिल पर्यंत सुरूच राहील असे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान कोरोना बाधित रुग्णांना सर्व प्रकारची मदत देण्याचे आदेश त्यांनी दिली आहेत त्याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल असेही पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५१ झाली असून त्यात सर्वाधिक ४३ महाराष्ट्रातील आहेत.

संबंधित पोस्ट