माणुसकीची मूल्य जपणारा जिल्ह्याअधिकारी अब्दुल अजीम

अब्दुल अजीम (IAS अधिकारी) राज्य -तेलंगाना जिल्हा-भुपलपल्ली ठिकाण-जिल्हा मुख्यालय

तेलंगणा : जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयाकडे येते,कलेक्टर साहेब गाडीतून उतरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढतात...त्याच पायऱ्यावर एक म्हातारी हात जोडून बसलेली दिसते...

जिल्हाअधिकारी थांबतात, शिपायाला विचारतात... त्याच्याकडे काही माहिती नसते.

जिल्हाअधिकारी स्वतःहा त्या म्हातारी शेजारी पायऱ्यावर बसतात.

आज्जीला विचारतात काय अडचण आहे,आज्जी सांगते दोन वर्षांपासूनची पेंशन भेटली नाही.साहेब कागदपत्र मागतात,आज्जी सगळे कागदपत्र साहेबांच्या हातात ठेवती.
आणि सोबत तिला झालेला सगळा त्रास विनंती वजा तक्रार स्वरूपात सांगती.
बाबू लोकांनी किती त्रास दिला किती चकरा मारल्या याचा सगळा लेखाजोखाच मांडती.
जिल्हाअधिकारी आज्जीचे सगळे कागपत्र व्यवस्थित चेक करतात आणि आज्जीला सांगतात इथेच थांबा तुमचं काम आजच होईल.

जिल्हाअधिकारी सबंधित अधिकाऱ्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश देतात.

तो अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यां  जवळ त्या पायऱ्यांवर उपस्थित राहतो.त्याच पायऱ्यांवर त्या म्हातारीच्या दोन वर्षांपासूनचा रखडत असलेला पेंशनचा प्रश्न सुटतो.

शेवटी कुठल्या पदावर कोण व्यक्ती आहे यापेक्षा त्या पदावरील ती व्यक्ती किती संवेदनशील आहे हे महत्वाचं आहे.

लोकांच्या दुःखाची जाण असणाऱ्या,माणुसकीची मूल्य जपणाऱ्या जिल्हाअधिकारी अब्दुल अजीम  यांना  सलाम...


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट