
मी मुंबई शांत कशी राहणार
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 1398 views
मुंबई म्हटली सगळ्यांच्या डोळ्या समोर उभे राहते ते गजबजलेले रस्ते, रेल्वे, बस मध्ये आढळणारी अफाट गर्दी खरेदी साठी आतुरलेली माँल,चित्रपट गृह आणि नाट्यगृह समोर लागलेल्या प्रेक्षकाच्या रांगा तसेच जीभेचा हट्ट पुरवण्यासाठी पाणीपुरी, वडापाव खाण्यासाठी उंडालेली झुंबड, शाळेतून सुटल्यावर घरी जाताना बसमधला लहान मुलाचा किलबिलाट, गार्डन मध्ये चार मित्र आणि मैत्रिणीच्या झडणाऱ्या गप्पा या साऱ्यावर चीनच्या करोना विषाणू रोगाने आक्रमण करून मुंबईला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
पणमी मुंबई आहे मुंबई मी शांत राहूच शकत नाही.बाराही महिने मला जागायची सवय झाली आहे. ह्या मुंबईत अनेक जातींचे आणि धर्माचे लोक राहत आहेत. हजारो लोक या मुंबईत परराज्यातून कामधंदया साठी धडकत आहे. अनेकांना मी या मुंबईत सामावुन घेतले आहे आणि घेत राहणार मग या चीनच्या करोनाला घाबरतंय कोण?
पावसाळ्यात मुंबईच्या विविध सखोलभागात पाणी तुंबते. म्हणून काय आमची मुंबई आम्ही बंद ठेवत नाही.पुन्हा एकदा नव्या जोमाने हातात हात घालून पाण्यातून वाट काडत एकमेकांना वाट दाखवत ऑफिसला जातोच ना. मग अशा करोनाला घाबरून आम्ही घरी बसवून आमच्या मुंबईला शांत ठेऊ शकत नाही. अनेक रोग या मुंबईत येऊन गेले.पण या सगळ्यावर आम्ही मुंबईकरानी मात केली. मग हा कुठला मेड इन चायनाचा रोग आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय.अरे या मुंबईने कुष्ट रोग, क्षयरोग, एडस, प्लेग आशा अनेक महारोग्याना पळून लावले, इंग्रजांसारख्या मोठया रोगाला आमच्या मराठी माणसानी छातिचा कोट करून पिटाळून लावले तू तर चायनीज आहेस.
म्हणतात ना चायनीज वस्तू जास्त दिवस टिकत नाही तुझा काय टिकावं आमच्या मेड इन इंडिया पुढे लागणार आहे. आज तू पाहुणा म्हणून आमच्या कडे आला आहेस. आमच्या मुंबईत चार दिवसच पाहुण्याची सेवा करतात आणि पाचव्या दिवशी त्याला त्याचा घरचा रस्ता दाखवतात. तसेच तुझे आहे, तू चार घटकेचा पाहुणा, पाहूणचार घे आणि आपल्या रस्त्याला लाग. कारण मी मुंबई.मला शांत राहण्याची सवय नाही.
मुंबईने अनेक रोगावर मात केली आहे.आणि करोनावर सुद्धा लवकरच मात करू आणि शांत झालेली मुंबई पुन्हा जोमाने नव्या इर्षेने कामाला लागेल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम