एसएसटी महाविद्यालयात स्त्रीयांनी अनुभवल्या लहानपणीच्या आठवणी.


   उल्हासनगर ( प्रतिनिधी ) :    जागतिक महिला दिनानिमित्त सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कुठे स्व:रक्षणाचे धडे तर कुठे स्त्री रोग मार्गदर्शन पर उपक्रम राबविले जातात.  मात्र एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर यांनी बॅक टु बचपन असा वेगळा उपक्रम राबविला आहे . 
 
 या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे  कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीच्या आई ला मान देण्यात आला.ती प्रत्येक स्त्री आजची खास माहेरवाशीन म्हणुन  एस एस टी महाविद्यालयात आली होती. 

   या उपक्रमा  द्वारे त्यानी घरातील कामात हरवून जाणाऱ्या स्त्रियांना त्यांचे २० वर्षांपूर्वीचे बालपण पुन्हा जगण्याचा व रोजच्या दगदगीचा जीवनात एक विरंगुळा म्हणून काही खास बालपणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात लिंबू चमचा, संगीत खुर्ची, बकेट बॉल, पावडर रेस या लहानपणी च्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.   लहानपणीचे हे  खेळ त्या उत्साहाने खेळत होत्या. त्यांच्या उत्साहाने  रोमांचक वातावरण तयार झाले.
     अशा रोमांचक वातावरणात अनेक स्त्रियांची सकारात्मक मते मिळाली. या मतातून असे अनुभव सांगितले गेले की त्यांनी त्यांचे बालपण कुठेतरी हरवले होते पण एस. एस. टी महाविद्यालयाच्या "बॅक टू बचपन" या कार्यक्रमामुळे त्यांनी त्यांचे बालपण पुन्हा जगले. काही स्त्रियांचे मत होते की , त्यांना आयुष्यात पदके  हे कधी मिळाले नाही ते आज मिळाले.. महाविद्यालयाच्या  मैदानात आज विद्यार्थी त्यांच्या आईला प्रोत्साहित करित होते. कुठेतरी हरवलेले बालपण आज या सर्व स्त्रीया जगल्या.  घरातील स्त्रीला तिच्या रोजच्या कार्यक्रमातुन थोडीशी विश्रांती मिळावी. तिने तीचं अस्तित्व ओळखावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुरसवानी यांनी   सांगितले आहे .

   या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या डब्लु डी सी.    डी एल एल ई  आणि  क्रीडा विभागाने  केले होते. तर डी एल एल ई  विभागाने मोफत पाणीपुरी,  तसेच शीतपेय याची व्यवस्था केली होती . तर आलेल्या सर्व स्त्रीयांचा पदक  देऊन सन्मान करण्यात आला.. विजेत्या महिलांना ट्रॉफी तर सर्व स्पर्धेत हिरहिरीने सहभाग घेणाऱ्या आजींना पैठणी साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

संबंधित पोस्ट