वीज चोरी पकडल्याने महावितरणच्या अभियंत्याला मारहाण.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगरात महावितरण कंपनीच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यानी विज चोरी पकडल्याने महावितरणच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे.या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात पिता पुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      उल्हासनगर कॅंप  नं ४ च्या तीस सेक्शन भागात महावितरणच्या वीज चोरी पकडणाऱ्या भरारी पथकाकडून तपासणी सुरू होती.यावेळी बंटी बजाज यांच्या जिन्सं कंपनीत भरारी पथकाने विज चोरी पकडली.त्याच दरम्यान बजाज यांच्यावर कारवाई सुरू असतांना बंटी बजाज आणि त्याच्या वडिल अमरलाल बजाज यानी कारवाई करणाऱ्या सहाय्यक अभियंता सोलोमन तलारी आणि त्याच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केली म्हणून अभियंत्यांच्या तक्रारी वरुन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बजाज पिता पुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सहकाऱ्यांना मारहाण झाल्याचे कळताच महावितरणचे अधिकारी दिलीप कुभंरे व कर्मचाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात  बंटी बजाज व अमरलाल बजाज यांच्या विरुध्द गु.र.न.७२/२०२० भा.द.वि.३५३,३३२,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पी.एस.आय आर.एफ.मावळे करीत आहे.




रिपोर्टर

संबंधित पोस्ट