कोपरखैरणे पाणीपुरवठा विभागातील पंप चालकाचा जीव धोक्यात !
- by Reporter
- Mar 04, 2020
- 1112 views
नवीमुंबई (प्रतिनिधी): नवीमुंबई महानगरपालिकेतील कोपरखैरणे पाणीपुरवठा विभागातील पंप चालकांचा जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.या बाबत पंप चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन पालिका आयुक्त व पाणी पुरवठा अधिकारी यांना साकडे घालून आमचा जीव वाचवा अशी मागणी करणार आहेत
या बाबत माहीती आशी कि कोपरखैरणे विभागात पंपचालक म्हणून सात कर्मचारी काम करत आहेत तीन शीप मध्ये हे कर्मचारी कोपरखैरणे विभागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा व्हावा म्हणून प्रमाणिक पणे कार्यरत आहेत पण याच कर्मचारी वर्गाचा जीव कधी जाईल याची शाश्वती या कर्मचा-यांना नाही त्या मुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोपरखैरणे परिसरात तीन टाकी हा परिसर आहे या तीन टाकी मधुनच कोपरखैरणे विभागाला पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा नागरिकांना सुरळीतपणे व्हावा या साठी पालिकेने वाँल बंद करणे अथवा चालु करणे याची जबाबदारी पंप चालकांना दिली आहे मात्र हा पाणी पुरवठा विभागाचा वाँल हा भर रस्त्यावर आहे व बाजूलाच सिग्नल आहे. ज्या वेळी सिग्नल सुरु होतो त्या वेळी वाहने सुसाट वेगाने धावत असतात रात्री अपरात्री पाणी पुरवठ्याचा वाँल या पंप चालकांना चालु किंवा बंद करावे लागते काही वाहन चालक दारुच्या नशेत जोरदार वेगाने वाहन चालवत असतात आशातच पंप चालक पाणीपुरवठा करणा-या टाकीत वाँल सुरु किंवा बंद करण्यासाठी खाली उतरत असतात या पंप चालकांना कधी वाहनाची धडक बसेल याचा नियम नाही त्यातुन जीवित हानी होऊ शकते.
दरम्यान : या बाबत या पंप चालकांनी आपली तक्ररी तोंडी स्वरुपी या विभागात काम करणा-या पर्यवेक्षकाच्या कानी घातले असता त्या पर्यवेक्षकांने या कामगारांना बे जबाबदारीचे उत्तर देऊन एखाद्या पंप चालक मेला तरी चालेल असे बेजबाबदार पणे उत्तर दिले या सुपरवायझर चे नाव अनिल शिंगे असून या सुपरवायझरच्या बेताल शब्दांचा पंप चालकाने जाहीर निषेध व्यक्त केला असून त्यावर कारवाई करा अशी मागणी पंप चालकां कडुन व्यक्त होत आहे या अगोदर देखील पंप चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपले गाऱ्हाणे मांडलेले आहे परंतु त्यांच्या मागणीची दखल कोणीच घेतलेली दिसून येत नाही त्या मुळे पंप चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे
रिपोर्टर