लग्नात डान्स करत होती १३ वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार
लग्नात डीजेवर डान्स करत असताना नराधमाने १३ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत बोलावून नेलं आणि बलात्कार केला.
- by Adarsh Maharashtra
- Mar 03, 2020
- 1566 views
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथं एका नराधमाने पोलिस ठाण्याशेजारीच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस ठाण्याच्या शेजारी लग्न समारंभात डीजे सुरू होता. त्यावर डान्स करणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. सातवीत शिकणाऱ्या मुलीला नराधमाने तिथल्याच एका हॉलच्या मागे नेऊन अत्याचार केला.याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बलात्कारानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो पळून गेला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
हमीरपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितलं की,'सुमेरपूर ठाण्याच्या जवळ एका हॉलमध्ये लग्न सुरू होतं. तिथं अल्पवयीन मुलगी डीजेवर डान्स करत होती. त्यावेळी भागातील एका व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कारानंतर पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी नराधमाने दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडित मुलीने लग्नाच्या हॉलमध्ये जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई पीडितेला घेऊन सुमेरपूर पोलिस ठाण्यात पोहोचली. अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम