हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. कल्याण स्थानकात ही दुर्दैवी घटना घडली. अनु दुबे (वय २३) असे या तरुणीचे नाव आहे

 

 कल्याण (प्रतिनिधी):कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे एका तरुणीच्या जीवावर      बेतले आहे. रुळ ओलांडताना लोकलने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. कल्याण स्थानकात ही दुर्दैवी घटना घडली. अनु दुबे (वय २३) असे या तरुणीचे नाव आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या धीम्या लोकलने तरुणीला धडक दिली. या अपघातात अनु दुबे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला रेल्वेकडून समांतर भिंत बांधण्याचे काम सुरू होते. हे काम अपूर्ण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी भिंत नसलेल्या वाटेचा पायवाट म्हणून प्रवासी वापर करत होते. वेळ वाचवण्यासाठी दररोज शेकडो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलंडतात. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.


धडक दिली. या अपघातात अनु दुबे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला रेल्वेकडून समांतर भिंत बांधण्याचे काम सुरू होते. हे काम अपूर्ण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी भिंत नसलेल्या वाटेचा पायवाट म्हणून प्रवासी वापर करत होते. वेळ वाचवण्यासाठी दररोज शेकडो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलंडतात. रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.   दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अनु दुबे या तरुणीच्या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.  


                                                                                                                                                                                                                                                                         

रिपोर्टर

संबंधित पोस्ट