
ठाणे: दिव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई, स्थानिक जेसीबीवर चढले
दिव्यातील साबे गाव परिसरात डंम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी सरकारी कांदळवनांच्या क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी रोखून धरले. मागील कारवाईच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रश्नांकडून अधिक पोलीस कुमक मागवली होती.
- by Sanjay Pachouriya
- Jan 06, 2020
- 566 views
ठाणे (प्रतिनिधी):दिव्यातील साबे गाव परिसरात डंम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी सरकारी कांदळवनांच्या क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी रोखून धरले. मागील कारवाईच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रश्नांकडून अधिक पोलीस कुमक मागवली होती. परंतु त्यानंतरही कारवाई सुरू होताच स्थानिक जेसीबीवर चढले आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. या विरोधामुळे कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आले आहे.
दिव्यातील कांदळवनांच्या जमिनींवर भराव टाकून गेल्या काही वर्षांमध्ये दिव्यात चाळींचे साम्राज्य तयार झाले आहे. २०१६ मध्ये या प्रकरणी अरिफ इराकी यांनी याचिका दाखल केली होती. यावर २७ ऑगस्ट २०१९ रोजी उच्च न्यायालयाकडून या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. १० जानेवारी २०२० पुर्वी हे बांधकाम हटवण्याचे न्यायालयाचे निर्देश असल्याने १० डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा प्रशासनाकडून कारवाईचा प्रयत्न करण्यात आला. या भागातील तीन सर्वेनंबर वरील झोपड्यांना तशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच जाहीर फलक या भागात लावण्यात आले होते. परंतु कारवाईसाठी गेल्या पथकाला रोखण्यासाठी सुमारे तीन ते चार हजारांचा जमाव उभा ठाकला होता. कारवाईसाठी निघालेल्या जेसीबी आणि इतर वाहनांनाही रोखण्यात आले होते. यावेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मध्यस्ती करून कारवाई पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसेच न्यालयात भुमीका मांडण्यासाठीही वेळ मागितला होता. त्यानुसार न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु साबे गावातील कांदळवनांच्या क्षेत्रातील चाळींना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा या भागात कारवाईला तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि महापालिका पथके दाखल झाली. परंतु पुन्हा जमावाने कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यातील साबे गाव परिसरात डंम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी सरकारी कांदळवनांच्या क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांनी रोखून धरले. मागील कारवाईच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रश्नांकडून अधिक पोलीस कुमक मागवली होती. परंतु त्यानंतरही कारवाई सुरू होताच स्थानिक जेसीबीवर चढले आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. या विरोधामुळे कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आले आहे.
दिव्यातील कांदळवनांच्या जमिनींवर भराव टाकून गेल्या काही वर्षांमध्ये दिव्यात चाळींचे साम्राज्य तयार झाले आहे. २०१६ मध्ये या प्रकरणी अरिफ इराकी यांनी याचिका दाखल केली होती. यावर २७ ऑगस्ट २०१९ रोजी उच्च न्यायालयाकडून या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. १० जानेवारी २०२० पुर्वी हे बांधकाम हटवण्याचे न्यायालयाचे निर्देश असल्याने १० डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा प्रशासनाकडून कारवाईचा प्रयत्न करण्यात आला. या भागातील तीन सर्वेनंबर वरील झोपड्यांना तशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच जाहीर फलक या भागात लावण्यात आले होते. परंतु कारवाईसाठी गेल्या पथकाला रोखण्यासाठी सुमारे तीन ते चार हजारांचा जमाव उभा ठाकला होता. कारवाईसाठी निघालेल्या जेसीबी आणि इतर वाहनांनाही रोखण्यात आले होते. यावेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मध्यस्ती करून कारवाई पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसेच न्यालयात भुमीका मांडण्यासाठीही वेळ मागितला होता. त्यानुसार न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु साबे गावातील कांदळवनांच्या क्षेत्रातील चाळींना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा या भागात कारवाईला तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि महापालिका पथके दाखल झाली. परंतु पुन्हा जमावाने कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम