लोकल थांबवून मोटरमनने वाचवले प्रवाशाचे प्राण
ठाणे(प्रतिनिधी): मध्य रेल्वेच्या एका मोटरमनने माणुसकीचे दर्शन घडवत रेल्वे रुळांलगत विव्हळत पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रवासी अगोदरच्या लोकमधून पडला होता. अशाराम वर्मा असे मोटरमनचे नाव असून आपल्या कामाच्या पलीकडे जात चांगली कामगिरी केल्याबाबत वर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कार्तिक सिंह (२८) असे त्यांनी प्राण वाचवलेल्या प्रवाशाचे नाव असून तो दिव्याचा रहिवासी आहे. कार्तिक 'कांदिवलीहून आपल्या नातेवाईकांसोबत घरी परतत असताना त्याचा अपघात झाला'
आशाराम वर्मा हे ठाणे लोकल चालवत होते. त्यावेळी त्यांचा लोकल ठाकुर्ली स्थानकाजवळ येताच किंकाळ्या ऐकू आल्या. रेल्वे रुळालगत विव्हळत असलेला कार्तिक मदतीसाठी धावा करत होता. तेव्हा संध्याकाळचे ७.१५ वाजले होते. अंधार पसरलेला होता. ते सांगतात, 'मी ठाकुर्लीहून लोकल सोडली तेव्हाच अंधार पसरला होता. अचानक मला वेगळाचा आवाज ऐकू आला. मी लगेचच गाडी थांबवली. पाहिले तर एक तरुण रुळालगत विव्हळत पडलेला आहे. तो रडत होता. त्याला मदतीची गरज होती.' वर्मा यांनी ही माहिती मुंबई मिररशी बोलताना दिली. तरुणाला मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्याने वर्मा यांना तातडीने रेल्वे अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाचच मिनिटांत जीआरपी स्ट्रेचरसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण ट्रेन सुरू केली, असे वर्मा म्हणाले. यासाठी वर्मा यांना ६ मिनिटांसाठी लोकल थांबवावी लागली होती.
कार्तिक सिंह याच्यावर डोंबिवलीतील एका नर्सिग होममध्ये उपचार घेत आहे. कार्तिकच्या नातेवाईकांनी मोटरमन वर्मा यांचे आभार मानले आहेत कार्तिक सिंह यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आपल्या नातेवाईकांसह कांदिवली स्थानकात लोकल पकडली. ते दरवाजाच्या जवळच उभे होते. सर्वांचा कल्याणपर्यंत चांगला प्रवास झाला. कल्याणमध्ये अचानक गर्दी वाढली. लोकल ठाकुर्लीहून निघाली तेव्हा खूप प्रवासी आत आले. या रेटारेटीत कार्तिक फूटबोर्डापर्यंत सरकला आणि तो खाली कोसळला. त्यानंतर सरोज दुवा या कार्तिकच्या नातेवाईकाने गाडीतील साखळी ओढली. मात्र गाडी डोंबिवलीला गेल्यानंतरच थांबली असे दुवा याने सांगितले.

रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम