भयानक आहे हे,
आणि हे रोज जगावं लागत,
ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे.भारतीय रेल्वे सक्षम आहेच.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती. twitter.com/RajeshsKadam1/ …
'भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं'... डोंबिवलीच्या 'त्या' भीषण .वर मराठी अभिनेत्यानं व्यक्त केली खंत
'भयानक आहे हे,आणि हे रोज जगावं लागतं...' असं म्हणत त्याने एक Twitter पोस्ट केली आहे. त्यातून त्याने तमाम मुंबईकरांच्या वतीने एक विनंती केली आहे.
- by Sanjay Pachouriya
- Dec 25, 2019
- 1106 views
डोंबिवली. (प्रतिनिधी): ऐन ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेने विशेष मेगा ब्लॉक जाहीर केल्याने डोंबिवली पलीकडच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकल ट्रेनमध्ये लटकत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना गर्दी नवीन नाही. पण बुधवारी सार्वजनिक सुट्टी असली, तरी अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं कामकाज सुरू होतं. चाकरमान्यांची ऑफिस गाठायला रोजची धावपळ होती, पण लोकलची संख्या मात्र कमी होती. त्यातून मेगा ब्लॉकचा भार असल्यामुळे जीवघेणी कसरत करतच डोंबिवलीकरांना लोकलमध्ये चढावं लागलं. डोंबिवली स्टेशनवरच्या भीषण गर्दीचा एक VIDEO सोशल मीडियाव व्हायरल झाला होता. त्यावर व्यक्त होताना प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं 'भयानक आहे हे,आणि हे रोज जगावं लागतं...' असं म्हणत एक Twitter पोस्ट केली आहे. त्यातून त्याने तमाम मुंबईकरांच्या वतीने एक विनंती केली आहे.
सुबोध भावेनं राजकारणी आणि प्रशासन यांना आवाहन करताना लिहिलं आहे की, ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे. भारतीय रेल्वे सक्षम आहेच.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती."
मध्य रेल्वेने 25 डिसेंम्बर म्हणजे विशेष ब्लॉक जाहीर केला होता. ठाकुर्ली येथील नवीन पादचारी पुलाच्या कामामुळे ठाणे ते डोंबिवली दरम्यान मध्यरेल्वेची वाहतूक 5 तास बंद ठेवण्यात आली. यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. विशेष मेगा ब्लॉक 9.45 ते 1.45 असा होता. त्यातच 8 वाजून 42 मिनिटांची आणि 9.06 मिनिटांची लोकल रद्द करण्यात आल्यामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 5 वर मोठी गर्दी झाली.
शेवटी पाऊण तासाने सकाळी 9.30 वाजता एक विशेष लोकल ट्रेन येण्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून देताच प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये प्रवाशांची भीषण गर्दी झाली. या पेक्षा धक्कादायक म्हणजे रेल्वे गाडी येताच प्रवाशांची रेल्वेत चढण्याकरता जीवघेणी कसरत केली. तोच रेल्वे रुळावर उभे असलेल्या प्रवाशांनी विरुद्ध दिशेने रेल्वेत चढण्यास सुरुवात केली. मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना काय सुविधा मिळतात? रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द
ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
सकाळी 9.45 ते दु. 1.45 या काळात 400 मेट्रिक टन वजनी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक 5 तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
ऐन नाताळच्या सुट्ट्यांचा मोसमात मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली स्टेशनवर पादचारी पूलाचे 400 मेट्रिक टन वजनी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचे काम करण्यात येत आहे. गर्डर उभारण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सला जाणाऱ्या चाकरमान्यांसह इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्टेशनवर मोठी गर्दी आहे. विद्यार्थ्याना सुटी असल्याने याच दिवसांमध्ये मुंबईकर फिरायला बाहेर पडतात.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम