पुलावामात केंद्रीय राखीव दलाच्या बसवर स्फोटके भरलेल्या कारने आत्मघाती हल्ला; ३७ जवान शहीद

हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे शहीद झाले आहेत.

 श्रीनगर- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्यात ३७ जवान शहीद झाले. जम्मू-श्रीनगर महामार्गावर लेथपोरायेते एका आत्मघाती अतिरेक्याने ३५० किलो स्फोटकाने भरलेली एसयूव्हीने ताफ्यातील एका बसला धडक मारली. स्फोटामुळे दोन बसच्या चिंधड्या झाल्या. या ताफ्यात सीआरपीएफच्या ७८ बसमधून २५४७ जवान होते. यातील बहुतेक जण सुटी संपवून कामावर परतत होते. काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी १४ वर्षांनंतर कार बॉम्बचा वापर केला आहे.
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील दोन जवान शहीद झाले आहेत. नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून या दोघांच्या गावात शोककळा पसरली आहे.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३७  जवान शहीद झाले. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८ मध्ये तो जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाला होता.

या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड हे शहीद झाले आहेत. लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावातील नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले आहे. या गावात नितीन राठोड नावाची दोन व्यक्ती असून दोघेही सीआरपीएफमध्येच कार्यरत आहेत. त्यामुळे गावात संभ्रमाचे वातावरण आहे. तर संजय राजपूत यांच्या भावांना याची माहिती मिळाली असली तरी आई आणि पत्नीला यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने या दोन जवानांसंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट