
उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन यशस्वी लवकरच मिळणार सातवा वेतन .
- by Rameshwar Gawai
- Jan 12, 2021
- 965 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : राज्य शासनाने सातवा वेतन सर्वच कर्मचाऱ्याना लागु केलेला असताना उल्हासनगर महापालिका कर्मचारी हे या वेतना पासुन वंचित होते त्यामुळे महापालिकेत अनेकदा काम बंद आंदोलने करन्यात आली तरी पण ही महापालिका प्रशासन सातवा वेतन देन्यास असमर्थ होती . परंतु १२जानेवारी रोजी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात सर्वच युनियन च्या कर्मचाऱ्यानी सहभागी होवुन महापालिका प्रशासनाला वठणीवर आणले आहे .या काम बंदच्या दणक्याने महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी महापौर कार्यालयात बैठक घेवुन कर्मचाऱ्याना लवकरच सातवा वेतन देन्यात येइल असे आश्वासन दिल्याने काम बंद आंदोलन मागे घेन्यात आले आहे .
उल्हासनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांची चार युनियन आहेत . तेव्हा आपापल्या मागण्या करिता हे युनियन अलग अलग आंदोलने करित होते. त्यामुळे मागण्या मान्य होत नव्हत्या.दरम्यान सातवा वेतन लागु करन्यासाठी अनेकदा आंदोलने केलीत पण त्याचा महापालिका प्रशासनावर कोणताच फरक पडत नव्हता . अखेर काल चार ही युनियन च्या नेत्यानी एकत्र येवुन १२ जानेवारी रोज बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले होते.तेव्हा महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी आंदोलनाचा धसका घेत ताबडतोब युनियन नेते दिलीप थोरात . चरणसिंग टाक,राजेंद्र आढांगळे,राधाकृष्ण साठे,दिपक दाभणे याना महापौर कार्यालयात बोलवुन बैठक घेतली आणि त्या बैठकीत उर्वरित मागण्यासह सातवा वेतन देन्याचे मान्य केले आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकते पुढे महापालिका प्रशासन झुकल्याने हे आंदोलन यशस्वी झाले आहे.तर आयुक्ताने महापौर कार्यालयात बोलवलेल्या बैठकीत महापौर लिलाबाई आशान,उपमहापौर भगवान भालेराव नगरसेवक अरुण आशान युनियन नेते दिलीप थोरात,चरणसिंग टाक आशाराम टाक,राजेंद्र आंढांगळे,राधाकृष्ण साठे . दिपक दाभणे, मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर लेखाधिकारी विकास चव्हाण हे उपस्थित होते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम