कैलास निचिते यांची भाजयुमो च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

शहापुर(महेश धानके)भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये सक्रिय पणे कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वरची जबाबदारी देण्याचे काम सुरू असून मागील काही वर्षांपासून प्रदेश सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे पार पडणाऱ्या कैलास निचिते यांची आता प्रदेश उपाध्यक्ष पदावर बढती झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

कैलास निचिते हे ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्याचे भूमिपुत्र असून मागील 6 वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत, युवा मोर्चच्या प्रदेश सचिव पदी त्यांची काही वर्षांपूर्वी  नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघटनेत झोकून देऊन काम केले,प्रदेश व केंद्रीय स्तरावरील सर्व उपक्रमात भाग घेऊन भाजप विचार अगदी गाव खेड्यात पोहचविण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली,2014 मध्ये राज्यात व केंद्रात भाजप सरकार असूनही लाभाचे पद न घेता त्यांनी संघटन वाढवण्यात भर दिल्यानेच त्यांना ही अत्यंत महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे,भाजप मध्ये प्रदेश स्तरावर पद भूषविणारे ते शहापुर तालुक्यातील पहिले युवा कार्यकर्ते आहेत,2014 व 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रामाणिक पणे काम करून तरुण वर्ग भाजप विचार धारेशी त्यांनी जोडला आहे,त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे,

संबंधित पोस्ट