सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तातडीने सुरू करण्यासाठी माजी पालकमंत्री तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांचे नेतृवात धरणे आंदोलन

अकोला (प्रतिनिधी) : अकोला येथे सुमारे १५० कोटी रुपये खर्च करून भाजप सरकारने अकोल्यात उभे केलेलें सुपर  स्पेशलिटी हॉस्पिटल फक्त पदभारती साठी धूळ खात उभे आहे. कोविड -१९ मुळे आज जिल्ह्यात आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चून खाजगी हॉस्पिटल मध्येही रुग्णांना बेड मिळत नाही. अत्यावश्यक उपचारा आभावी अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृतू झाला आहे. तेव्हा सदर हॉस्पिटल साठी तत्काळ  पद भरती करून रुग्ण सेवेसाठी सुरू करण्यात यावे या मागणीसाठी माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे नेतृत्वात आज ३ सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी माजी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी नोकर भरती करण्यात यावी यासाठी सभागृहात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला आहे मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाहीं. सध्या कोरोना महामारीत या हॉस्पिटल चे  महत्त्व आहे रुग्ण संख्या खुप वाढली आहे त्यामुळे रुग्णची गैरसोय होत आहे करीत या हॉस्पिटल ची पदभरती तातडीने करून आकोले करांच्या सेवेत समर्पित करण्यात यावे अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज ३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात भाजपा नेते डॉ. अशोक ओळबे, जेष्ठ नगरसेवक हरिष भाई आलिंमचांदनी,माजी आमदार वसंतरावजी खोटरे,माजी आ. नारायणराव गव्हाणकर,अँड मोतीसिंहजी मोहता,संजय चौधरी,नगरसेवक आशीष पवित्रकार,गिरीश गोखले, माजी नगरसेवक गोपी ठाकरे,अँड. सुभाषसिंह ठाकुर,जयंत सरदेशपांडे,पुंडलिक आखरे,प्रवीण देशपांडे,राजू शेळके,मनोजकुमार खंडेलवाल,विजय पनपालिया,निकेश गुप्ता,सुधीर राठी,राजेश मिश्रा, पवन सुर्वे, डॉ. अमोल केळकर,डॉ.सुनील लुल्ला,राजकिरण राठी, सौ. अंजली  जोशी,  सौ. सोनल ठाकुर,जीव शर्मा,अश्विन लोहिया, सचिन बोरेकर,सलिम गोरवे,भाऊराव साबळे, गजानन  जयभाये ,अँड राजनारायण मिश्रा,आशिष ढोमणे,विजय मोटे, सूरज मत्तलवर,प्रभाकर वानखडे,राम खरात,अक्षय नागझरे,गणेश सपकाळ,विलास मेतकर,प्रशांत पाटील,भारत पाटील,विक्रम पवित्रकार शिवानंद तराळे,हरिष शाह, अण्णा ताले,आशुतोष काटे, प्रवीण ठाकरे, संजय देशमुख,सोनू उज्जैनकर, जयंत सरदेशपांडे,गणेश मानकर,प्रतीक रंधे, पुरषोत्तम चतरकार,शैलेश येवले,युवा स्वाभिमानाचे नरेंद्र पुणेकर रमेश खंडारे, भगवान खडसे,भागवत गवळी श्रीकांत एखंडे,पवन सुर्वे,आदित्य सराग,महेश गोंधळेकर,राजेश गायकवाड,दिनेश श्रीवास,नौशाद खान यांचेसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी तथा अकोलेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट