RBI Monetary Policy: रेपो रेट ४% तर रिव्हर्स रेपो रेट ३.३% कायम

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारताच्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गर्व्हरनर शक्तिकांत दास  यांनी आज (६ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत देशाच्या अर्थव्यवस्थेचा सहामाहीचा लेखाजोखा मांडला आहे. 

आर्थिक पतधोरण  जाहीर करताना  देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात रेपो रेट  ४% तर रिव्हर्स रेपो रेट  ३ .३% कायम रहणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यावेळेस माहिती देताना त्यांनी कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे असे सांगताना त्यांनी दिलेली अजून एक दिलासादायक बाब म्हणजे आता देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरूवात झाली आहे.

आरबीआय गर्व्हरनर शक्तिकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एप्रिल महिन्याच्या तुलनेत आता देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारायला सुरूवात झाली आहे. मात्र देशात महागाई दर वाढताच आहे.

२०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी रेट निगेटीव्ह मध्येच राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे. भारतामध्ये यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीतही वाढ झाली आहे.

संबंधित पोस्ट