भयंकर!डॉक्टर बनला हैवान, 100 जणांने खून करून मगरींना खाऊ घातलं

दिल्ली (प्रतिनिधी) : अनेक आजार, विकारांपासून मुक्तता मिळवून देणारे डॉक्टर हे परमेश्वराचं रूप मानले जातात. पण, अशा व्यवसायात राहूनही अनेक जण भीषण कृत्य करतात. अशा एका डॉक्टरचा सैतानी प्रताप उघड झाला आहे. एका प्रकरणात अटकेत असलेल्या डॉक्टरने तब्बल १०० जणांना मारून मगरींना खाऊ घातल्याची खळबळजनक माहिती मिळत आहे.

दिल्लीतील देवेंद्र शर्मा नावाचा आरोपी गेल्या १६ वर्षांपासून किडनीच्या अवैध व्यापार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता. तो गेला काही काळ पॅरोलवर बाहेर पडला होता. मात्र, पॅरोल संपल्यानंतर तो पुन्हा जेलमध्ये न येता फरार झाला. दोन दिवसांपूर्वी त्याला पुन्हा पकडण्यात आलं.तेव्हा त्याच्या या भीषण कृत्यांविषयी खुलासे झाले.

देवेंद्र शर्मा हा सिरीयल किलर असून त्याने आधी ५० खून केल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता त्याने १०० हून अधिक लोकांना यमसदनी धाडल्याचं सांगत त्यांचे मृतदेह उत्तर प्रदेशमधील एका नदीत मगरींना खाऊ घातल्याचं कबूल केलं आहे. किडनी प्रकरणाव्यतिरिक्त शर्मा हा गॅसचा अवैध व्यापार करत असल्याचंही उघड झालं आहे.

देवेंद्र शर्मा नावाच्या या डॉक्टरने १९८४ मध्ये आयुर्वेदात पदवी घेतली आणि राजस्थानात क्लिनिक सुरू केलं होतं. १९९४ मध्ये त्याने गॅस एजन्सी उघडण्यासाठी एका कंपनीत ११ लाख रुपये गुंतवले होते. ती कंपनी अचानक गायब झाली आणि त्याचं नुकसान झालं. त्यानंतर त्याने १९९५ मध्ये स्वतःची बनावट गॅस एजन्सी उघडली. शर्माने एका गँगला यासाठी पैसे दिले होते. ही टोळी शर्मासाठी एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकांना लुटत असे. ट्रकचालकाचा जीव घेऊन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असे.

या टोळीसोबत काम करताना त्याने २४ जणांना यमसदनाला धाडलं. त्यानंतर तो एका प्रत्यारोपणासाठी किडनी पुरवणाऱ्या गँगमध्ये सामील झाला. त्याने तिथे सात लाख प्रति ट्रान्सप्लान्ट अशा हिशोबाने १२५ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या. या प्रकरणी त्याला २००४ मध्ये शिक्षा झाली होती. तो १६ वर्षं कैदेत होता आणि पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर फरारी होण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित पोस्ट