उल्हासनगर महापालिका कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सतर्क . शहरात तीन कोव्हिड रुग्णालये कार्यरत .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर मध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता महापालिकेने दोन नवीन कोव्हिड केयर सेंटर तयार केले आहेत . फालवर लाईन येथे असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत १५० बेड ची व्यवस्था केली असुन आय टी आय या ठिकाणी ६० बेड चे रुग्णालय तयार होत आहे . त्यामुळे शहरात सध्या तीन कोव्हिड रुग्णालय सज्ज झाले आहेत . मात्र दोन रुग्णालये कोरोना रुग्णामुळे फुल झाल्याने पर्याय म्हणुन डॉ बाबासाहेब अभ्यासिकेत  देखिल बेड तयार केले  आहेत  . 

उल्हासनगर शहरात रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे . महापालिकेने कॅंप ४ येथिल शासकिय प्रसुतीगृह ताब्यात घेवुन तेथे कोव्हिड रुग्णालय बनविले असुन त्या ठिकाणी ९० बेड ची व्यवस्था आहे दरम्यान रुग्णांचा वाढता आकडा पाहता कामगार रुग्णालयात सुध्दा अधिक रुग्ण दाखल असल्याने पर्याय म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला कोव्हिड केयर सेंटर रुग्णालय बनवुन तेथे १५० बेड ची व्यवस्था केली आहे . तर कॅंप ३ येथिल आय टी आय मध्ये देखिल ६० बेड चे कोव्हिड केयर सेंटर तयार करन्यात येत आहे . जर कोरोनाचे अधिक रुग्ण वाढलेच तर बेड अपुरे पडु नये म्हणुन महापालिकेने ही सज्जता ठेवली आहे शहरात सध्या ३८० कोरोनाग्रस्त रुग्ण असुन  ते या तीन कोव्हिड रुग्णालयात उपचारा करिता दाखल आहेत . यातील १०० च्या वर  रुग्ण बरे होवुन घरी गेलेले आहेत . त्यामुळे रुग्ण बरा होन्याचा आकडा सुध्दा चांगला आहे . दरम्यान शहरात रुग्णाचा आकडा अधिक वाढलाच तर महापालिका लग्न समारंभाचे हॉल देखिल ताब्यात घेवु शकते . सध्या शासकिय प्रसुतीगृह . कामगार रुग्णालय . व डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका मध्ये कोव्हिड केयर सेंटर असे तीन रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार होत आहेत . या रुग्णालयात महापालिकेने डॉक्टर . नर्सेस आणि अन्य स्टाफ दिलेला आहे . तर औषधाचा पुरवठा सुध्दा बऱ्या पैकी असल्याने रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत .

संबंधित पोस्ट