"छिंदम"ला शिवसेनेच्या नगरसेवकांची मारहाण; शिवसेनेला मतदान केल्याचा राग

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या श्रीपाद छिंदम याला शुक्रवारी सभागृहात बेदम चोप देण्यात आला. छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. याचा राग  आल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. तसेच त्याचे मतदानही नाकारण्यात आले आहे.

छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. आम्ही छिंदमचे मत मागितले नव्हते. मात्र, भाजपाचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छिंदमशी हातमिळवणी करुन मुद्यामहून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याला सभागृहात उपस्थित ठेवून सेनेला मतदान करायला लावले, असा आरोप सेनेचे बाळासाहेब बोराटे व युवराज गाडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे सेनेने उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारले. छिंदमला आम्ही सभागृहातच चोपले असा दावा सेनेने केला आहे. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे २३ व छिंदमचे १ आणि सपाचे १ असे २५ मते मिळाली.

छिंदमला मारहाण करणा-या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट