'नेहरु विज्ञान केंद्र मेट्रो स्टेशन'च्या बांधकामा आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडली; व्यवसायिक स्वरुपाच्या १६ पात्र अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची निष्कासन कारवाई

मुंबई :दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात नेहरु विज्ञान केंद्राजवळील मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित स्थानकाच्या बांधकामाच्या आड येणारी आणि इ-मोझेस मार्ग व सेनापती बापट मार्ग यांच्या जंक्शनवरील रखांगी चौकात असणारी १६ पात्र अनधिकृत बांधकामे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. या बांधकामांचा वापर हा प्रामुख्याने व्यवसायिक स्वरुपाचा करण्यात येत होता. आज करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान महापालिकेच्या चमूला स्थानिकांच्या रोषाला व दगडफेकीच्या घटनांनाही सामोरे जावे लागले. तथापि, संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु असलेल्या या कारवाई दरम्यान मुंबई पोलीसांनी केलेल्या विशेष सहकार्यामुळे निष्कासन कारवाई यथोचित प्रकारे पार पाडण्यात आली आहेत, अशी माहिती 'जी दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त श्री. नरेंद्र रामकृष्ण बर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार 'जी दक्षिण' विभागाद्वारे आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तोडण्यात आलेल्या १६ बांधकामांमध्ये १५ दुमजली (Gr. + 1) व एका तीन मजली (Gr. + 2) बांधकामांचा समावेश आहे. या कारवाईमुळे नेहरु विज्ञान केंद्र मेट्रो स्थानकाच्या बांधकामास गती मिळणार आहे. तर कारवाई दरम्यान तोडण्यात आलेल्या पात्र अनधिकृत बांधकामांशी संबंधितांना मुंबई मेट्रो द्वारे पर्यायी जागा देण्यात येणार आहेत. ही कारवाई करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे ३० कामगार – कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तर मुंबई पोलीस दलाच्या २५ कर्मचा-यांचा फौजफाटा देखील घटनास्थळी तैनात होता. ही कार्यवाही करण्यासाठी २ पोकलेन, २ जेसीबी, गॅस कटर्स आणि आवश्यक ती साधनसामुग्री देखील वापरण्यात आली, अशीही माहिती श्री. देवेंद्र जैन यांनी दिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट