उपेंद्र कुडवा झाला, आता चंद्रकांत सूर्यवंशी, किरण धस वर कारवाई कधी?
अँटीकरप्शन ब्यूरोची अशीच कारवाही मुंबई मनपा "बी" विभागातील चंद्रकांत सुर्यवंशी आणि किरण धस यांच्यावर कधी? असा जनतेचा सरकारला सवाल .......
- by Adarsh Maharashtra
- Dec 12, 2018
- 825 views
मुंबई येथील अँटीकरप्शन ब्युरोच्या कारवाहीत सहाय्यक अभियंता उपेंद्र कुडवा यांना ज्ञात स्त्रोता पेक्षा जास्त संपदा चौकशी दरम्यान आढळल्याने कुडवा यांच्यासह त्यांची पत्नी
आणि आईलाही अटक केली. या संदर्भात लांचलूत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे अपसंपदा प्रकरणी गुन्हा अहवाल सादर करण्यात आलेला असुन ला.प्र वि. मुंबई यांचे कड़े तक्रारदार पांडुरंग भाऊसो ठोंबरे (स.पो.आ.) ला.प्र.वि., मुंबई युनिट. यांनी तक्रार दाखल करीत आरोपी उपेंद्र काशिनाथ कुडवा या सहाय्यक अभियंता (बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई वर्ग-२) यांचे सह पत्नी सौ.कृपाली उपेंद्र कुडवा आणि आई श्रीमती दीपा काशिनाथ कुडवा यांचे विरुद्ध गु.नोंदविण्यात आलेला आहे.( CR NO: ४५/२०१८ ) कलम १३(१)(ई) सह १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित कलम १३(१)(बी) सह १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८) सह कलम १०९ भा.द. वि. (सुधारित कलम १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८) असा गुन्हा नोदविलेला आहे.या बाबत ACB ने परीक्षण (१२/०३/२००७ ते दि. ०८/०९/२०१७) केले असता अपसंपदा रक्कम रु ७,३१, ७४३.३३/- आढळून आली. सहाय्यक अभियंता उपेंद्र कुडवा यांचे उघड चौकशी दरम्यान त्यांच्या सेवाकाळातील परिक्षण कालावधीत ज्ञात स्त्रोतातून मिळालेल्या उत्पन्नपेक्षा रु. ७,३१,७४३.३३/- इतकी अधिक (१०.७४%) अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न होऊन त्यास त्यांचे पत्नी व आई यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. एन्टी करप्शन ब्यूरो च्या अधिकारीवर्गाने केलेल्या या कारवाहिचे जनतेतुन स्वागत होत आहे.
अशीच कारवाही मनपा बी विभागातील इमारत व कारखाने विभाग सहाय्यक अभियंता चंद्रकांत सूर्यवंशी आणि दुय्यम अभियंता किरण धस यांच्यावरही व्हावी अशी मागणी होत आहे कारण या दोघांच्या कारर्कीदीत बी विभागातमोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माण झालेली असुन यातून त्यांनी प्रचंड पैसा कामविला आहे. यातील चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काही महिन्यांपूर्वी परदेशवारी केल्याची बातमी आदर्श महाराष्ट्राने दिली होती. इमारत व कारखाने विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत सुर्यवंशी,दुय्यम अभियंता किरण धस यांच्या काळात या सोन्याचा भाव असलेल्या विभागात जास्त प्रमाणात बेकायदा बहुमजली टाँवर मधील पार्किंग रेप्युजी एरिया मध्ये गेस्ट हाऊस,कमर्शियल दुकाने निर्माणावर तोडक कारवाई होऊ नये म्हणून विकासाकडून लाखो रुपये या जोडगोळीने म्हणजेच जय आणि विरू या दुकलीने गब्बर पैसा जमविल्याची खात्रीशीर माहिती सुत्रानी दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम