
लोकप्रतिनिधींच्या आदेशालही पालिका अधिकाऱ्यांची केराची टोपली! यांचे करायचे काय?
- by Reporter
- Jun 14, 2024
- 253 views
मुंबई- भ्रष्टाचाराच्या कुरणावर पोसलेले पालिका अधिकारी आजकाल इतके मुजोर झाले आहेत की जनतेची कामे तर पैसे घेतल्या शिवाय करीतच नाहीत पण जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सुधा फाट्यावर मारतात.एकीकडे पालिकेचा पगार आणि दुसरीकडे भूमाफिया किंवा बेकायदेशीर कामे करणाऱ्यांकडून मिळणारे हप्ते यामुळे अधिकारी इतके माजले आहेत की त्यांचे आता थोबाड रंगविण्याची वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
माहपालिकेचा बी विभाग हा तर भ्रष्टाचारी लोकांचा अड्डा आहे इथल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नागरिकांनी कितीतर तक्रारी केल्या पण पालिका अधिकाऱ्यांच कानात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांनी नोटांचे बोळे कोंबलेले असल्याने त्यांना जनतेच्या तक्रारी ऐकायला येत नव्हत्या अखेर सत्ताधारी भाजपचे आमदार नितीश राणे यांनी या भागाला भेट दिली आणि पाहणी करून अधिकाऱ्यांची हजेरी घेतली त्यावेळी वेळ मारून नेण्यासाठी सहाय्यक आयुक्त उध्दव चंदनशिवे आणि इमारत विभागाचे सहाय्यक अभियंता युगंधर मराठे यांनी बेकायदा बांधकामे काढतो असे आश्वासन दिले पण लोकसभा इलेक्शन ड्यूटीचे कारण पुढे करून नितेश राणेंच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली म्हणजे सत्ताधारी आमदाराला सुधा हे लोक जुमनायला तयार नाहीत आता नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या दोन अधिकाऱ्यांची चौकशी लावावी व अनधिकृत बांधकामांना वाचवण्यासाठी या दोघांनी किती घेतले याचा त्यांची कॉलर पकडून जाब विचारावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी इथले लोक करीत आहेत.
रिपोर्टर