मोदी पर्वांच्या शपथविधी सोहळ्याचा अकोल्यात जल्लोष

रणधिर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते असुन मोदी प्रर्वाच्या विजयाचा अकोल्यात भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २४० जागा जिंकल्या तर एनडीए आघाडीने २९४ जागा जिंकल्या. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अनेक देशातील राष्ट्रप्रमुखांना बोलवण्यात आले होते. या शपथविधी "सोहळ्याचे भाजपतर्फे सिव्हिल लाइन चौकात एलईडी स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधिर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, तेजराव थोरात, महानगराध्यक्ष जयंत मसने, संघटन महासचिव माधवराव मानकर, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, प्रशांत मानकर, कापशीचे उपसरपंच अंबादास उमाळे, माजी तालुकाध्यक्ष अनिल गावंडे, टोलू जयस्वाल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीष जोशी, दिलीप सागळे, मंगेश लोणकर आदी पदाधिकारी व कार्यकत्यांनी लाडू वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकत्यांनी भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

   आमदार सावरकरांनी धरला ठेका

ढोल-ताश्यांच्या निनादात आमदार सावरकरांनी धरला ठेका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने ढोल- ताश्यांच्या निनादात जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधिर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने आदी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी ढोल-ताश्यांच्या ठेक्यावर ताल घरला.

   खा. प्रतापराव जाधवांची वर्णी

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये अकोला जिल्हा शिवसेना संपर्कनेते तथा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात वण लागल्याबद्दल शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्यांनी महापालिका चौकात जल्लोष साजरा केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाले आहे, मोदी पर्वाच्या विजयाचा अकोल्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला. शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी योगेश बुंदेले, शहरप्रमुख रमेश गायकवाड, राजु भोर, विदर्भ वैद्यकीय सेलचे अमित वरणकार, महीला आघाडी च्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख संगिता शुक्ला, महानगर प्रमुख उमा ताई शर्मा, नगरसेवीका सपना ताई नवले, शहरप्रमुख निशाताई घ्यारेल, स्वानंदी ताई पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .



संबंधित पोस्ट