
३४ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा- अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड
- by Reporter
- Mar 11, 2024
- 254 views
मुंबई : सन २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या स्पर्धेत एकूण २४ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे.
गलिब (मल्हार), माझ्या बायकोचा नवरा (भद्रकाली प्रॉडक्शन), जन्मवारी (सेवन स्टुडिओज आर्ट), चाणक्य (अभिजात क्रिएशन्स), २१७ पद्मिनी धाम (प्रग्यास किएशन्स), जर तर ची गोष्ट (सोनल प्रॉडक्शन्स), मी नथुराम गोडसे बोलतोय (माऊली प्रॉडकशन्स), अस्तित्व (भरत जाधव एंटरटेनमेंट), मर्डरवाले कुलकर्णी (अष्टविनायक), यदा कदाचित रिटन्स (भूमिका व सोहम).
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. प्रकाश निमकर, श्री. विजय टाकळे आणि श्री. प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञांचे अभिनंदन केले असून भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
रिपोर्टर