गिरगाव चौपाटीवर पार-पडली महिलांची मॅरेथॉन स्पर्धा डॉ मंजू मंगलप्रभात लोढा ह्यांनी सादर केली सुंदर कविता

नारीशक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत गिरगाव चौपाटीवर मॅरेथॉन स्पर्धा पारपडली ह्या स्पर्धेत ३०० हून जास्त महिलांनी सहभाग नोंदवला. रस्त्या ऐवजी गिरगाव चौपाटीवरच्या वाळूतन चालत आणि धावत ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान महिलां समोर होते.

मुंबई: नरेंद्र मोदी यांच्या नारीशक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सोमवारी दि.४ सकाळी ६:३० वाजता गिरगाव चौपाटी फूड स्टॉल प्लाझा पासून ते गिरगाव चौपाटी विविंग गॅलरी पर्यंत खास महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत तीनशेहून अधिक महिलानी भाग घेतला. महिलांनचा पुरस्कार आणि प्रोत्साहित करण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

मॅरेथॉन स्पर्धा अनोख्या पद्धतीने पार पडण्याकरता रस्त्या ऐवजी ती गिरगाव चौपाटीवर घेण्यात आली. चौपाटीवरच्या वळूत्न चालत आणि धावत ही स्पर्धा पूर्ण करायचे आव्हान महीलान समोर होते पण महिलांना आयोजकांची कल्पना पसंतीस पडली. अनेकांच्या मनात लाहपणीच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. गिनीज बुक मॅरॅथॉन रेकॉर्ड असलेल्या क्रांती साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्मअप, एक्सरसाइज  करून थोडे चालणे, थोडे धावणे, उलटे चालणे,गोल गोल धावणे असे विविध प्रकारे हा स्पर्धेत घेण्यात आले.  

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर मंजू मंगलप्रभात लोढा आल्या होत्या नारी शक्तीवर आधारित एक खूप सुंदर कविता त्यांनी सर्वांसमोर सादर करून उपस्थितांची मनी जिंकली .स्त्रीची विविध नाती त्यातून त्यांनी उलगडली. प्रत्येक स्त्रीने आपली स्वतःचीच पाठ थोपटली पाहिजे आणि एक दिवस आपला खास आपल्यासाठीच साजरा करावा अशी प्रेरणा सगळ्यांना दिली.   

स्पर्धेत मधील सर्व सहभागी महिलांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देण्यात आले. या कार्यक्रमात पिंकीथॉन तसंच मैत्री स्पिरीच्युअल ग्रुप यांच्या काही महिला जोडल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमासाठी काही पुरुष कार्यकर्त्यांनी देखील मदत केली.ह्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मुंबई महिला मोर्चा महामंत्री सौ अनघा बेडेकर यांनी घेतली होती. कार्यक्रमास मुंबई उपाध्यक्ष शालकाताई साळवी उत्साहाने भाग घेतला, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री निता मुंजानी, सोशल मीडिया प्रमुख मेघना व्यास, अध्यक्ष पल्लवी सप्रे, मलबारहिल अध्यक्ष छाया चौधरी ह्यांच्या सह महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता करताना विकसित भारत संकल्प पत्र ह्या बद्दल माहिती सांगितली आणि सहभागी महिला व येणाऱ्या जाणाऱ्या जनते कडून त्यांचे सूचना घेतल्या गेल्या.

संबंधित पोस्ट