दक्षिण मुंबईत म.न.से.चे उत्तरायण !

मुंबई-(मंगेश फदाले ) दक्षिण मुंबईच्या कुलाबा विधानसभा मतदार संघात रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी म.न.से.नी भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे.

दक्षिण मुंबईत कुलाबा विधानसभा म.न.से कार्यकर्त्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या हळदी कुंकू समारंभाला शर्मिला राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तसेच म.न.से नेते बाळा नांदगावकर , म.न.से सरचिटणीस राजेंद्र शिरोडकर , जिजा बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस सुप्रिया दळवी असे मान्यवर प्रामुख्याने या सोहळ्याला आपली हजेरी लावणार आहेत.

शर्मिला राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळं दक्षिण मुंबईतील म.न.से. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र सध्या आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या दक्षिण मुंबईतील उत्तरायण मुळे कार्यकर्त्यांच्या मनाला उभारी मिळून एक सकारात्मक  राजकीय वातावरण निर्मितीसाठी नक्कीच मदत होणार आहे !

आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील म.न.से. कार्यकर्त्यांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे मत काही तळागळातील एकनिष्ठ  आणि मेहनती म.न.से. कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

ज्याप्रमाणे उत्तरायण मध्ये गंगा भूतलावर  अवतरली तसेच मतांच्या गंगेचा अभिषेक होऊन म.न.से.ला बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सत्तेचा लाभ होईल की नाही हे सध्या मतदार राजाच्या हृदयातलं गुपित आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उत्तरायण मध्ये महाराष्ट्रात म.न.से.चे अधिकाधिक लोकसभा उमेदवार निवडून येण्यासाठी शुभ ठरेल की नाही हे मात्र शेवटी मतदार राजाच ठरवणार आहे !

या भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभासाठी मागच्या चार दिवसांपासून सबंध दक्षिण मुंबई मधून महिला कार्यकर्त्यांची लगबग चालू होती.

" कुलाबा विधानसभा मतदारसंघातील म.न.से कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी शर्मिला वहिनींचा दौरा हा महत्त्वाचा ठरेल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील " अशी प्रतिक्रिया 

कुलाबा विधानसभा मतदार संघांचे म.न.से.चे नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष बबनराव महाडिक यांनी व्यक्त केली. तर नवीन पदनियुक्त्या झाल्यावर निवडणूक होण्याअगोदर दक्षिण मुंबईतील पहिला महिला विशेष कार्यक्रम मांडवी कोळीवाड्यात अर्थात वॉर्ड क्रमांक २२४ मध्ये होतोय याचा आनंद स्थानिक शाखाध्यक्ष रोहन चाळके यांनी व्यक्त केला !

कुलाबा विधानसभा मतदार संघातील या भव्य दिव्य हळदी-कुंकू समारंभामध्ये सुवासिनीच्या वाणासह आणि म.न.से.च्या मानासह चिमरूड्या मुली , तरुणी यांच्यासह मांडवी कोळीवाड्यातील अनेकांचे प्रेरणास्रोत असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिता फदाले यांच्या डान्स टॅलेंटची मजा प्रेक्षकांना लुटता येणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबईत विविध प्रतिष्ठित आणि नामांकित स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावलेले मांडवी कोळीवाड्यातील मंगळागौर समुहाच्या वतीने  मंगळागौरचा विशेष कार्यक्रम देखील सादर होणार आहे.

या भव्य-दिव्य हळदी कुंकू समारंभाला रोजगार  स्वयंरोजगार विभाग सरचिटणीस अनिल फोंडेकर यांच्यासह आदी म.न.से पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तर या सोहळ्याचे निमंत्रक म.न.से उपाध्यक्ष अरविंद गावडे , कुलाबा विभाग सचिव मनिषा राणे आणि महिला विभाग अध्यक्षा सुवर्णा गोताड यांच्या सह सर्व महिला शाखा अध्यक्षा आणि महिला महाराष्ट्र सैनिक आहेत.

संबंधित पोस्ट