प्रगती फाउंडेशन तर्फे ताडदेव मध्ये भव्य दिव्य रथयात्रा आणि महाआरतीचे आयोजन

मुंबई  : आयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगळवार-पासून सुरुवात झाली आहे सोमवार २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. संपूर्ण देश राम भक्तीत दंग झाला आहे. या पार्श्वभुमीवर २२ जानेवारीला ताडदेव मध्ये श्री राम प्रभूंच्या भव्य दिव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

लहान बालकांच्या रूपात नेहमीच आपल्याला देव दिसत असतात रथ यात्रे दरम्यान प्रभू रामचन्द्र, सीता माता, आणि लक्ष्मणाच्या रूपात लहान मुले वेषभूषेत दिसणार आहेत. ह्यामुळे ह्या भव्य दिव्य रथ यात्रेला एक वेगळेच स्वरूप येणार आहे. रथयात्रे बरोबर महाआरती सोहळ्याचे आयोजन देखील प्रगती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

ही रथ यात्रा भाटिया हॉस्पिटल समोरील फोर्जेट स्ट्रीट जवळच्या जय हरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथून २२ जानेवारीला सकाळी १०:४५ वाजता  सुरू होणार आहे त्यानंतर स्वाती हॉटेल, ताडदेव सर्कल येथील हनुमान मंदिराला वळसा मारून भाटिया हॉस्पिटल येथेन जय हरी सोसायटी जवळ आल्यानंतर यात्रा समाप्त होणार आहे. 

ताडदेव येथे सोमवारी निघणाऱ्या ह्या भव्य दिव्य अशा श्री राम प्रभूंच्या रथ यात्रा आणि महाआरती सोहळ्यासाठी ताडदेव परिसरातील सर्व नागरिक, सामाजिक कार्यकरते, व्यवसायिक, दुकानदार ह्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रगती फाउंडेशन तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट